• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GT vs RCB Live Streaming : गुजरात-बंगळुरु आमनेसामने, शुबमनसेना विराटच्या टीमला पराभूत करणार?

April 29, 2026 by admin Leave a Comment


गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांची आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात 30 एप्रिलला आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांची या मोसमात एकमेकांविरुद्ध खेळण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. याआधी उभयसंघात 6 दिवसांआधी सामना झाला होता. बंगळुरु विरुद्ध गुजरात यांच्यात 24 एप्रिलला सामना झाला होता. त्या सामन्यात आरसीबीने गुजरातवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे गुजरातसमोर सामना जिंकून गेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. त्यामुळे गुजरात सामना जिंकून आरसीबीचा हिशोब करणार की गतविजेता संघ शुबमनेसेनेला दुसऱ्यांदा पराभूत करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. रजत पाटीदार आरसीबीचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.

गुजरात आणि बंगळुरु या दोन्ही संघांचा हा नववा सामना असणार आहे. गुजरातने आतापर्यंत 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत. गुजरात 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. तर आरसीबीने 8 पैकी 6 सामन्यांत पराभूत केलं आहे. आरसीबी 12 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

गुजरात विरुद्ध बंगळुरु सामना कधी?

गुजरात विरुद्ध बंगळुरु सामना गुरुवारी 30 एप्रिलला होणार आहे.

गुजरात विरुद्ध बंगळुरु सामना कुठे?

गुजरात विरुद्ध बंगळुरु सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.

गुजरात विरुद्ध बंगळुरु सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

गुजरात विरुद्ध बंगळुरु सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

गुजरात विरुद्ध बंगळुरु सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

गुजरात विरुद्ध बंगळुरु सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायलाम मिळेल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हजारो लोक आजूबाजूला तरी तुम्ही एकटे का पडता? चाणक्यांनी सांगितलं तुम्ही काय चूक करताय?
  • Vastu Shastra : पैशांचे व्यवहार करताना कायम या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा व्हाल कंगाल
  • MI vs SRH : हेड-क्लासेनचा झंझावात, हैदराबादचा विजयी पंच, मुंबईचा 6 विकेट्सने धुव्वा
  • IPL 2026 Points Table : हैदराबादला मुंबई विरुद्धच्या विजयानंतर मोठा फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?
  • IPL 2026: मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात, सहाव्या पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in