• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महाराष्ट्र पुन्हा हादरला! खासगी शाळेच्या बस चालकाकडून 3 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

September 4, 2026 by admin Leave a Comment


मुंबईजवळ असलेल्या नवी मुंबईत शाळेच्या बसमध्ये अवघ्या 3 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी बस चालकाला अटक केली आहे. कोर्टाने आरोपीला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नवी मुंबईतील एका खासगी शाळेच्या 30 वर्षीय बस चालकाने हादरवारं कृत्य केल्याचे उघड झालं आहे. या घटनेने नवी मुंबई, पनवेल परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेने मुलांसाठी खास भाडेतत्वावर बस घेतली होती. ही बस आरोपी चालवत होता. या बस चालकाच्या कृत्याने नवी मुंबई हादरली आहे. त्याच्या विरोधात पोक्सो अॅकट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकली दररोज खासगी शाळेच्या बसने प्रवास करायची. ही चिमुकली बुधवारी दुपारी 12.30 वाजता कोमोठेच्या एका  शाळेतून घरी जाण्यासाठी निघाली. या बसमधील सर्व विद्यार्थी घरी गेले. त्यानंतर बसमध्ये एकटीच चिमुकली होती. त्यावेळी नराधमाची वाईट नजर मुलीवर पडली. त्यानंतर नराधमाने चिमुकलीवर अत्याचार केला.

चिमुकलीवर अत्याचार, पालकवर्गात संताप 

अत्याचारानंतर चिमुकली घरी पोहोचल्यानंतर पोटात दुखत असल्याचे आजीला सांगितले. त्यानंतर तिने ड्रायव्हर काकाने चुकीचे वर्तन केल्याचे सांगितले. आजीने तातडीने शाळा प्रशासनाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नराधमाने अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी ड्रायव्हरच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंदवला. यावेळी शाळा प्रशासनात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा जबाब देखील नोंदवून घेतला. त्याला गुरुवारी कोर्टात हजर केल्यानंतर त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याआधी देखील नंदूरबारमध्ये एका चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण नवी मुंबईत संताप व्यक्त केला जात आहे. चिमुकलीवर अत्याचार झाल्याने इतर पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आता पालकांकडून नराधमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच या घटनेनंतर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. बसमध्ये शाळा प्रशासनाकडून लहान मुलांच्या सुरक्षेसाठी एका महिलेची नियुक्ती केली नव्हती का, असा सवाल उपस्थित होत आहे. आता या प्रकरणात काय कारवाई केली जाते, याकडे सर्व पालकांचं लक्ष लागलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुण्यात हल्ला झाल्यानंतर विद्यानंद बापट यांची मोठी घोषणा, मारहाणीनंतर पहिल्यांदा आले समोर
  • कुस्ती खेळाडू अश्विनी पौळ यांच्या आयुष्यात तीन महिन्यांपासून मोठे वादळ, नवऱ्याच्या..
  • अखेर त्या भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल; अपघातानंतर गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक, चाळीसगावात घडलं काय?
  • Nagpur DJ Ban : मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात भाजपचा शहराध्यक्ष म्हणतो ‘आम्ही डीजे वाजवणारचं’
  • CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in