
मार्चमध्ये नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात यांच प्रकरण समोर आलं आणि संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. महिलांवर अत्याचार, काळी जादू, फसवणूक अशा विविध गुन्ह्यांमध्ये त्याला अटक करण्यात आली. अशोक खरात याला अटक केल्यानंतर पोलीस चौकशीत त्याचे एक -एक हादरवणारे कारनामे समोर आले. दरम्यान आता लवकरच या भोंदू अशोक खरात यावर एक चित्रपट येत आहे, ज्या चित्रपटाचं नाव महाराष्ट्र एल्फिन्स्टन फाईल असं आहे, या चित्रपटामध्ये दीपाली सय्यद यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाबाबत बोलताना आता माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे, या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले शहाजी बापू पाटील?
अशोक खरातवर चित्रीत होत असणाऱ्या महाराष्ट्र एल्फिन्स्टन फाईल या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये एक घोटाळा झाला आहे. अशोक खरात सांगोला तालुक्यात येऊन पूजा करून गेला आहे. उघडया नागड्या पद्धतीने धिंगाणा घालून सांगोला येथील जवळ्याकडे पूजा केली. माझा भाचा असणाऱ्या अतुल पवारला निवडणुकीत पराभूत करून जीवे मारण्यासाठी पूजा केली. मात्र मी माझ्या भाच्याला सांगितले, तुझा मामा या महाराजाच्या बापाचा बाप आहे. तू मरत नाही काळजी करू नको. त्यामुळे हा प्रसंग अशोक खरात वर चित्रीत होणाऱ्या चित्रपटात घेतला आहे का ? असा सवाल माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दीपाली सय्यद यांना केला आहे.
सांगोला येथे शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी मंत्री भरत गोगावले , मंत्री योगेश कदम , दिपाली सय्यद उपस्थित होत्या. यावेळी दिपाली सय्यद यांना उद्देशून शहाजी बापू पाटील यांनी सांगोल्यातील अशोक खरातचे कारनामे सांगून माजी आमदार दीपक साळुंखे यांना टोल लगावला आहे. दरम्यान महाराष्ट्र एल्फिन्स्टन फाईल हा चित्रपट नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर असून, तो आता लवकच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, हा चित्रपट सध्या राज्यात चांगलाच चर्चेमध्ये आहे.
Leave a Reply