• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘महाराष्ट्र एपिस्टिन फाईलल्स’ प्रकरण तापलं, आम्हाला हसू येतंय…, दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांबद्दल नेमकं काय म्हणाल्या?

July 7, 2026 by admin Leave a Comment


नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उजेडात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अशोक खरात याला अटक केल्यानंतर त्याचे एक एक काळे कारनामे समोर आले. दरम्यान आता अशोक खरात याच्यावर आधारीत महाराष्ट्र एपिस्टिन फाईल्स नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांच्यावर आधारित पात्र साकारणार आहेत. मात्र या चित्रपटाला रुपाली चाकणकर यांनी विरोध केला आहे. ही केस कोर्टात चालू असताना अशा प्रकारे चित्रपट काढणे योग्य नसल्याचं चाकणकर यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्याकडून  या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांना २५ कोटी रुपयांच्या अब्रु नुकसानीची नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.

दरम्यान या नोटीसीनंतर आता अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर आपली भूमिका मांडली आहे. आमच्यावर 25 कोटीचा दावा टाकण्यात आला आहे. ज्यांनी हा दावा केला, त्यांच्यावर आम्हाला हसू येत आहे.  कारण हा चित्रपट आत्मचरित्र नाहीये, या चित्रपटामध्ये कुठल्याही व्यक्तीच्या नावाचा वापर केला गेलेला नाहीये, चित्रपट करत असताना आमच्यावर कोणत्याही प्रकारची रोकठोक होत असेल तर ते चुकीचं आहे, असं यावेळी दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. दरम्यान हा चित्रपट न बनवू देण्यामागे तुम्ही जे केलं ते खरं आहे का? असा सवालही यावेळी दीपाली सय्यद यांनी केला आहे. जे काही असेल त्याला आम्ही कोर्टात उत्तर देऊ, असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं.

रुपाली चाकणकर यांची 25 कोटीची नोटीस आली आहे,  आम्ही कुणाची अब्रु घालवण्यासाठी नाही तर, महिला अत्याचार आणि भोंदूगिरी या विरोधात आमचा हा चित्रपट आहे. 2 ऑक्टोबरला महाराष्ट्र्र एप्सटिन फाईल्स चित्रपट येणारच आहे, अशी प्रतिक्रिया यावर चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी दिली आहे, दरम्यान यावर आता रुपाली चाकणकर काय प्रतिक्रिया देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in