• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महाराष्ट्रावर दुहेरी संकट… अचानक आलेल्या वादळी पावसाने दाणादाण, कुठे दिला ऑरेंज अलर्ट?

April 23, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचा कहर पहायला मिळत आहे. आज पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात आणि इतरही काही भागात वादळी पावसाने हजेरी लावली होती. सातारा जिल्ह्यातीला काही भागाला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीटीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जावळी तालुक्यातील ओझरे गावात जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर रामनगर परिसरात मोठं वडाचं झाड शेडवर कोसळल्याने हॉटेल सह वाहनांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

संगमेश्वर तालुक्याला अवकाळीचा तडाखा

रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्याच्या काही भागाला विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. तुरळ इथं मेघगजनेसह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक मंदावली होती. हवामान विभागाने वर्तवलेला अवकाळी पावसाचा अंदाज खरा ठरला आहे. कोकणासाठी आज हवामान विभागाने अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार दुपारनंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली. आता पुढील दोन दिवसही अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या अवकाळी पावसामुळे एप्रिल महिन्यातील आंबा पीक धोक्यात आले आहे, यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

चिपळूणमध्येही कोसळधार

रत्नागिरीतील चिपळूणमध्येही आज अचानक वादळी पावसाला सुरुवात झाली होती. आज वातावरणात प्रचंड बदल जाणवत होता आणि उष्णतेत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे अचानक अवघ्या दहा मिनिटांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. हा अचानक झालेला पाऊस आंबा बागायतदारांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. या वादळी पावसाचा हापूस आंबा बागांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

कुडाळमध्येही पावसाच्या सरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारनंतर प्रचंड गडगडाटासह पावसाने हजेरी लावली होती. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. सकाळपासून जिल्ह्यात प्रचंड उकाडा वाढला होता, त्यानंतर दुपारनंतर अचानक हवामानात बदल होऊन संध्याकाळी कुडाळ व सावंतवाडी तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली तर उकाड्याने हैराण झालेल्यांना काहीसा दिलासा मिळाला.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत बोललेच पाहिजे, प्रताप सरनाईक यांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना इशारा
  • ‘धुरंधर’चा जमील जमाली झाला मालामाल; खुश होऊन आदित्य धरने दिला इतका बोनस
  • हम ‘आप’ के ‘सात’ नही, राघव चढ्ढा यांच्यासोबत केजरीवालांना धक्का देणारे सात खासदार कोण? नावं आली समोर; एका क्रिकेटपटूचाही समावेश
  • मांस शिजवताना करताय अशा चुका, आरोग्यासाठी ठरतील धोकादायक, जाणून योग्य पद्धत
  • Cricket : भारतात खेळण्यावर बंदी घालताच अनुभवी खेळाडूकडून निवृत्तीचा निर्णय, कोण आहे तो?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in