• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मांस शिजवताना करताय अशा चुका, आरोग्यासाठी ठरतील धोकादायक, जाणून योग्य पद्धत

April 24, 2026 by admin Leave a Comment


लहान मुलांपासून वृद्धांना देखील मांस प्रचंड आवडतं. मांस शिजवण्याची प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते. अनेकांनी आमटीमध्ये मांस आवडतो तर, अनेकांना तळलेला. वेगवेगळ्या प्रकारे मांस तयार केले जाते. पण मांसाची उत्तम चव मिळवण्यासाठी, ते योग्य प्रकारे शिजवणे अत्यंत आवश्यक आहे. मांस शिजवताना काही गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. फ्रिजमध्ये साठवलेल्या मांसापेक्षा ताजे मांस खरेदी करणे सर्वात चांगले. खराब झालेल्या मांसावर तुम्ही कितीही मसाला टाकला तरी त्याची चव चांगली लागत नाही. म्हणून, मांस खरेदी करताना ताजे मांस खरेदी करा…

फ्रिजमधून मांस बाहेर काढताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. चिकन मॅरिनेट केल्याशिवाय कधीही शिजवू नका. याचा अर्थ, ते मीठ आणि मसाल्यांच्या पाण्यात भिजवून ठेवावे. यामुळे कमी शिवल्यानंतर देखील ते चविष्ट लागते. एवढंच नाही तर, त्यातील ओलावा टिकून राहतो. मांस एकसारखे शिजण्यासाठी आणि त्याची चव चांगली येण्यासाठी, त्याचे समान तुकडे करा.

मांस शिजवताना भांडे झाकणे महत्त्वाचे आहे. यामुळे वाफ आत कोंडून ओलावा टिकून राहतो. तसेच मांस कोरडे होण्यापासूनही बचाव होतो. फार कमी लोकांना मांसाहारी पदार्थ आवडत नाहीत. पण एक स्वादिष्ट मांसाहारी पदार्थ बनवणे हे सोपे काम नाही. मांस निवडण्यात आणि ते योग्य प्रकारे शिजवण्यात होणाऱ्या चुकांमुळे केवळ चवच कमी होत नाही, तर गंभीर आरोग्य समस्या आणि अन्न विषबाधा देखील होऊ शकते.

साल्मोनेला आणि ई. कोलाय सारखे जीवाणू मांसात वाढण्याची अधिक शक्यता असते. शिजवलेले मांस जास्त वेळ बाहेर ठेवणे टाळा. कच्चे मांस कापण्यासाठी वापरलेला चाकू आणि कटिंग बोर्ड स्वच्छ न करता इतर भाज्या किंवा अन्न कापण्यासाठी वापरल्यास जीवाणू पसरू शकतात. जर मांसाचा आतील भाग व्यवस्थित शिजला नसेल, तर त्यातील जंतू मरत नाहीत. विशेषतः चिकन आणि डुकराचे मांस व्यवस्थित शिजले नसल्यास, पोटदुखी, उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. हाडांजवळ रक्ताचे अंश दिसल्यास, ते व्यवस्थित शिजलेले नाही याचे हे लक्षण आहे.

फ्रिजमधील मांस थेट गरम पाण्यात विरघळवण्याऐवजी, ते शिजवण्याच्या काही तास आधी फ्रीझरमधून काढून रेफ्रिजरेटरच्या खालच्या कप्प्यात ठेवा किंवा साध्या पाण्यात बुडवून ठेवा. स्वच्छता आणि योग्य स्वयंपाक पद्धतींचे पालन केल्याने मांसाहारी पदार्थ केवळ अधिक चवदारच बनत नाहीत, तर आपल्या आरोग्यासाठी देखील लाभदायक ठरेल.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा AAPला रामराम
  • Jio, Airtel की Vi कोणाचं इंटरनेट सुपरफास्ट? उत्तर वाचून चकित व्हाल
  • सचिनने लावला होता डाव, आता त्या कंपनीचा शेअर गगनाला भिडला, एकाच महिन्यात 53 टक्के तेजी
  • AAP | दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला; केजरीवाल यांना सर्वात मोठा धक्का
  • KKR IPL Playoff: सात पैकी एक सामना जिंकलेल्या केकेआरला प्लेऑफची संधी, कसं काय ते समजून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in