• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Cricket : भारतात खेळण्यावर बंदी घालताच अनुभवी खेळाडूकडून निवृत्तीचा निर्णय, कोण आहे तो?

April 24, 2026 by admin Leave a Comment


क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वर्ष योगदान दिलेल्या माजी बॉलिंग ऑलराउंडरने देशांतर्गत क्रिकेटला अलविदा केला आहे. इंग्लंडच्या समित पटेल याने वयाच्या 41 व्या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समितवर टी 20 ब्लास्ट स्पर्धेत 6 महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली. त्यानंतर समितने हा निर्णय जाहीर केला. समितवर बंदी का घातली गेली होती हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

इंग्लंड-वेल्स क्रिकेट बोर्डाने समित पटेल याच्यावर बंदी घातली. काही महिन्यांपूर्वी गोव्यात वर्ल्ड लेजेंड्स प्रो लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. समित या स्पर्धेत सहभागी झाला होता.

बंदीमागील कारण काय?

गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला बीसीसीआयकडून परवानगी देण्यात आली नव्हती. ईसीबीच्या नियमानुसार, परवानगी नसलेल्या स्पर्धेत सहभागी झाल्यास इंग्लंडमधील देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळाडूंना 6 महिने सहभागी होता येत नाही. त्यानुसारच समितवर ही कारवाई करण्यात आली. तसेच ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज पीटर सिडल यालाही याच कारणामुळे बंदीच्या कारवाईचा सामना करावा लागला आहे.

समित पटेल आणि निवृत्ती

“मी माझ्या देशांतर्गत क्रिकेट कारकीर्दीचा शेवट करत आहे. मात्र मी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून दूर जाणार नाही. मी आता कोचिंग, मेंटरिंग आणि कॉमेंट्रीत योगदान देण्यासाठी उत्सूक आहे”, असं समितने स्पष्ट केलं.

“मला या खेळाने खूप काही दिलं आहे. मी आयुष्यभराचे सोबती बनवले आहेत. मी जगभर फिरलोय. ट्रॉफी जिंकण्याच्या आठवणी आयुष्यभर माझ्यासोबत कायम राहतील”, असंही समितने नमूद केलं.

समित पटेल याची क्रिकेट कारकीर्द

समितने नॉटिंघमशरचं तब्बल 22 वर्ष अनेक प्रकारात प्रतिनिधित्व केलं होतं. तसेच समित काही वेळ डर्बीशरकडून खेळला आहे. समितने देशांतर्गत क्रिकेटमधील 231 फर्स्ट क्लास, 253 लिस्ट ए आणि 429 टी 20 सामने खेळले आहेत. समितने या दरम्यान 25 हजार 973 धावा केल्या आहेत. तसेच समितने 957 विकेट्स मिळवल्या आहेत. तसेच समितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडचं 18 टी 20i, 36 एकदिवसीय आणि 6 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा AAPला रामराम
  • Jio, Airtel की Vi कोणाचं इंटरनेट सुपरफास्ट? उत्तर वाचून चकित व्हाल
  • सचिनने लावला होता डाव, आता त्या कंपनीचा शेअर गगनाला भिडला, एकाच महिन्यात 53 टक्के तेजी
  • AAP | दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला; केजरीवाल यांना सर्वात मोठा धक्का
  • KKR IPL Playoff: सात पैकी एक सामना जिंकलेल्या केकेआरला प्लेऑफची संधी, कसं काय ते समजून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in