• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मला वाटेल तिथे स्पर्श केला, जळती सिगारेट लावली..; दिग्गज अभिनेत्रीने सांगितला सर्वांत वाईट अनुभव

July 26, 2026 by admin Leave a Comment


‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ या मालिकेत तुलसी विरानीची सासू सरिता विरानीची भूमिका साकारून अभिनेत्री अपरा मेहता घराघरात पोहोचल्या. या मालिकेतून अपरा यांना इतकी लोकप्रियता मिळाली की एकेकाळी त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असायचे, काहीही करायला तयार असायचे. मात्र यामुळे त्यांना बराच त्रासही सहन करावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अपरा यांनी त्यांच्या जुन्या दिवसांतील एक त्रासदायक आठवण सांगितली. एका कार्यक्रमादरम्यान त्यांना भेटण्यासाठी लोकांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. यामुळे त्यांना त्या गर्दीत धक्का-बुक्की झाली, काहींनी त्यांना चुकीच्या पद्धतीनेही स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता.

8000 दांडिया हवेत उडवल्या

‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत अपरा यांनी सांगितलं, “त्यावेळी ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर होती. त्यादरम्यान माझ्या गुजराती नाटकाचे प्रयोग कोलकातामध्ये पार पडत होते. कलामंदिरात त्याचे पाच शो होते. या शोदरम्यान एकही जागा रिकामी नसायची, पूर्ण सभागृह प्रेक्षकांनी भरलेलं असायचं. अशाच एका प्रयोगादरम्यान जेव्हा मी माझी एण्ट्री झाली, तेव्हा मला पाहताच लोकांनी तब्बल 8000 दांडिया हवेत उडवल्या होत्या.”

“लोकांनी वाटेल तिथे स्पर्श केला..”

“चाहत्यांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. काहींनी मला खेचून म्युजिशियनच्या पोडियममध्ये घेऊन गेले होते. लोक मला धक्काबुक्की करत होते, काहीजण मला खेचत होते. तरीसुद्धा मी चाहत्यांशी चांगल्याप्रकारे भेटण्याचा प्रयत्न करत होती. मी काहींशी हस्तांदोलन केलं, तेव्हा एकाने माझ्या हातातली हिऱ्याची अंगठी खेचण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्याने माझ्यावर जळती सिगारेट फेकली. संपूर्ण पोडियम हलू लागलं होतं. हा संपूर्ण अनुभव खूपच धक्कादायक होता. गर्दीत लोकं अक्षरश: वेडे झाले होते. मला ते पोडियमवरून खाली उतरण्यास सांगत होते, तेव्हा काही लोकांनी मला तिथून खाली उतरवण्यासाठी घेराव केला. त्या गर्दीत मला प्रत्येकजण वाटेल तिथे स्पर्श करत होता. मी मनात म्हटलं, ठीक आहे, करा स्पर्श.. तुम्हाला कायच मिळेल”, असं त्या पुढे म्हणाल्या.

अपरा मेहता यांनी ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’, ‘खिचडी’, ‘सात फेरे’, ‘राजा की आएगी बारात’, ‘जमाई राजा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in