• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘मला प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का?’ उपोषण सोडल्यानंतर होणाऱ्या आरोपांनंतर सोनम वांगचुक संतापले

July 24, 2026 by admin Leave a Comment


नीट परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केले होते. मात्र तब्बल 26 दिवसांनंतर त्यांनी उपोषण सोडले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सरकारसोबत डील केल्याचे आरोप करण्यात आले होते. आता या आरोपांवर वांगचुक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 26 दिवस उपोषण केल्यानंतरही मला माझी प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का? जर मला सरकारसोबत डीलच करायची असती, तर मी 26 दिवस उपाशी राहिलो असतो का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

सोनम वांगचुक संतापले

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची गुरुवारी मध्यरात्री भेट घेतल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले 26 दिवसांचे उपोषण मागे घेतले. मात्र, उपोषण सोडल्यानंतर त्यांच्यावर सरकारसोबत डील केली असे आरोप करण्यात येत आहेत. या आरोपांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वांगचुक म्हणाले, ’26 दिवस उपोषण केल्यानंतरही मला माझी प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का? जर सरकारशी तडजोडच करायची असती, तर इतके दिवस उपोषण करण्याचा प्रश्नच निर्माण झाला नसता.’

सोनम वांगचुक यांचा व्हिडिओ

AFTER 26 DAYS OF HUNGER DO I NEED TO PROVE MY SINCERITY !!!
Do please watch and help spread the word. Find the full 22 minutes video on my YouTube Channel: Sonam Wangchuk pic.twitter.com/6CO3tjZsSD

— Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 24, 2026

अनेक लोकांचा पाठिंबा

दुसरीकडे 26 दिवसांचे उपोषण संपल्यानंतर काही जणांकडून त्यांचे कौतुक होत असले तरी मोठ्या संख्येने लोक त्यांच्यावर टीकाही करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची पत्नी गीतांजली जे. आंग्मो यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत टीकाकारांना उत्तर दिले आहे. लोकांनी त्यांच्या राजकीय विश्लेषणाला काही काळ विराम द्यावा आणि या आंदोलनासाठी सोनम वांगचुक यांनी वैयक्तिक पातळीवर किती मोठी किंमत मोजली आहे, याचाही विचार करावा.

11 किलो वजन घटले

गीतांजली आंग्मो यांनी सांगितले की, 26 दिवसांच्या दीर्घ उपोषणामुळे सोनम वांगचुक यांचे तब्बल 11 किलो वजन कमी झाले असून, त्यांना सध्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोनम वांगचुक यांच्यावर टीका करण्यापूर्वी स्वतःपेक्षा मोठ्या उद्दिष्टासाठी 26 दिवस उपाशी राहण्याचा अर्थ समजून घ्यायला हवा. त्यांनी विश्रांतीऐवजी त्यागाची निवड केली, त्यामुळे त्यांचे 11 किलो वजन कमी झाले असून त्यात मसल्स मांसाचेही नुकसान झाले आहे. किमान एक दिवस तरी त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवावी, त्यानंतरच त्यांच्यावर आपल्या अपेक्षा आणि राजकीय मतांचे ओझे टाकावे.’

 





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in