• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मला गंभीर आजार.., वाढदिवशीच रुग्णालयात पोहोचलेली अभिनेत्री; आरोग्याविषयी केला मोठा खुलासा

July 27, 2026 by admin Leave a Comment


‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री जास्मीन भसीन गेल्या दीड महिन्यापासून आरोग्याशी संबंधित विविध समस्यांचा सामना करत आहे. गेल्या महिन्यात ती तिच्या वाढदिवशीच दुबईतल्या रुग्णालयात दाखल होती. जास्मीनचा रुग्णालयातील एक फोटो तिचा बॉयफ्रेंड अली गोणीने सोशल मीडियावर शेअर केला होता. यादरम्यान आता जास्मीनने तिच्या आरोग्याविषयी मोठा खुलासा केला आहे. डॉक्टरांनी तिला एका गंभीर आजाराची शंका व्यक्त केली असून त्यावरील उपचार सुरू आहेत. वाढदिवस साजरा करण्यासाठी जास्मीन दुबईला गेली होती. मात्र दुबईत पोहोचताच तिची प्रकृती बिघडली. दुसऱ्याच दिवशी तिला कणकण जाणवू लागली होती. थकव्यामुळे कणकण जाणवत असेल, असं वाटून जास्मीनने गोळी घेतली. पण तीन दिवसांपर्यंत तिचा ताप उतरला नव्हता.

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जास्मीन म्हणाली, “दुबईला पोहोचल्यानंतर मला अस्वस्थ वाटू लागलं होतं. दुसऱ्याच दिवशी मला ताप आला होता. हे सर्व थकव्यामुळे होतंय, असं मला वाटत होतं. म्हणून मी पॅरासिटामॉल ड्रिप आणि आयव्ही फ्लुएड्स घेतले. पण तीन दिवसांपर्यंत माझा ताप उतरला नव्हता आणि माझी प्रकृती आणखीनच बिघडली. मग मी अली आणि माझ्या मित्रांना रुग्णालयात घेऊन जायला सांगितलं. माझ्या शरीरातील संसर्ग आणि दाह यांचं प्रमाण तपासण्यासाठी डॉक्टरांनी सीआरपी (CRP) चाचणी केली. ”

“ज्याची सामान्य पातळी 0 ते 5 असतं. पण माझ्यात ती पातळी 323 होती, जी खूप चिंताजनक होती. डॉक्टरांनी मला सांगितलं की माझ्या आतड्याच्या एका बाजूला सूज आली होती. त्यामुळे मला गंभीर आजाराचा संशय आला. त्यामुळे पुढील उपचारांसाठी मी भारतात परतले आहे. देवाच्या कृपेने मी आता बरी आहे. पण गेल्या दीड महिन्यापासून मी सतत आजारी पडत होते. आता तर ‘मी बरी आहे’ असं म्हणायलही मला भीती वाटते. मला असं वाटतंय की, यानिमित्ताने देव मला स्वत:साठी वेळ काढण्याचे आणि स्वत:वर प्रेम करण्याचे संकेत देत आहे. आता मी आधीपेक्षा अधिक स्वत:ची काळजी घेत आहे”, असं तिने पुढे सांगितलं.

जास्मीनला टर्मिनल इलियटीस नावाचा आजार आहे. ज्यामुळे लहान आतड्याला सूज येते. यामुळे पोटदुखी, उलट्या, सूज आणि आरोग्याशी संबंधित इतर गुंतागुंत निर्माण होतात.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in