
मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटल यांनी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा समारोप करत असताना तांदुळवाडी गावातील सांगता सभेत सरकारवर टीका केली. त्यांनी थेट फडणवीस मराठ्यांच्या विरोधात पोस्ट टाकायला सांगता हे तुम्हाला शोभतंय का? माझ्याकडून सन्मानाची अपेक्षा करता का? असे म्हटले आहे.
सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, इथे मराठे बाप आहेत आणि मराठेच बाप राहणार आहेत. क्षत्रिय मराठ्यांच्या नादला लागायचं बंद कर. (फडणवीस यांना इशारा) मराठ्यांच्या विरोधात लढायच्या आणि डाव टाकायच्या भानगडीत पडू नका. बावनकुळे आमच्या तोंडातला घास घालतो का? शहाणा होय. आम्ही मारायला भिणारी औलाद नाहीये, आम्हाला खुप संघर्ष करावा लागतोय. हरामखोरांनो तुम्हाला आम्ही ac मध्ये बसाविले .
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply