• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मराठमोळ्या तरुणाचा व्हिडीओ पाहून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाही भारावली, थेट व्हिडीओ डब करत म्हणाली…

July 24, 2026 by admin Leave a Comment


देशभरात शैक्षणिक प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अभियंता सूरज साधना विलास जाधव याने व्यक्त केलेल्या भावना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रत्येक नागरिकाने आपली भूमिका मांडली पाहिजे, असा संदेश देणारा सूरजचा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनेही सूरजच्या विचारांना पाठिंबा देत आपल्या फेसबुक अकाउंटवर एक जुना व्हिडिओ डब करून शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तिने सूरजने मांडलेल्या भूमिकेशी सहमती असल्याचे सांगितले आहे.

सूरज जाधवने आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच, ‘मी एक कलाकार आहे. मी संहिता (स्क्रिप्ट्स) वाचतो; त्यामुळे अशा प्रकारे मी माझे योगदान देणार आहे असे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर त्याने नागरिक म्हणून प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी अधोरेखित केली.

सूरज जाधवचा भावनिक संदेश

पुढे तो म्हणाला की, ‘माझा नेहमीच असा विश्वास राहिला आहे की, या देशाचे प्रौढ नागरिक म्हणून महत्त्वाच्या मुद्द्यांवर आवाज उठवणे ही आपली जबाबदारी आहे. त्या प्रश्नांचा आपल्यावर थेट परिणाम होत असो किंवा नसो, अन्यायाविरोधात बोलणे आवश्यक आहे. केवळ आपल्याला त्याचा फटका बसत नाही म्हणून एखाद्या समस्येकडे दुर्लक्ष करणे, हे स्वार्थीपणाचे लक्षण आहे. कारण भविष्यात कदाचित आपल्यालाही इतरांच्या पाठिंब्याची गरज लागू शकते. समाजात त्याच्यासारखा विचार करणारे अनेक लोक आहेत.

मात्र प्रत्येकालाच आपल्या भावना प्रभावीपणे शब्दांत मांडता येतातच असे नाही. त्यामुळे अशा लोकांच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केल्याचे त्याने सांगितले. लोकांना त्यांच्या मनातील विचार मांडण्यास मदत व्हावी, हीच माझी इच्छा होती. कारण शब्दांमध्ये मोठी ताकद असते. मी कोणताही नवीन संदेश तयार केलेला नाही, तर आधीपासून अस्तित्वात असलेल्या एका विचाराला माझ्या आवाजातून अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे असेही त्याने नमूद केले.

मराठमोळ्या तरुणाचा व्हिडीओ पाहून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाही भारावली pic.twitter.com/PL6LXaFIh2

— Soneshwar Patil (@soneshwar_patil) July 24, 2026

सोनाक्षी सिन्हाचा पाठिंबा

दरम्यान, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सूरजच्या या संदेशाला समर्थन देत फेसबुकवर एक जुना व्हिडिओ डब करून शेअर केला आहे. या माध्यमातून तिने नागरिकांनी सामाजिक प्रश्नांवर संवेदनशील राहणे, अन्यायाविरोधात आवाज उठवणे आणि लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी सक्रिय सहभाग घेणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in