• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ममता बॅनर्जींना पुन्हा जबर धक्का! आणखी काही आमदार भाजपच्या वाटेवर? नव्या ऑपरेशन लोटसची देशात चर्चा

August 30, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही काळापासून राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळाले आहे. अशातच आता मेघालयमध्ये भाजपचे ऑपरेशन लोटस जोर धरताना दिसत आहे. सध्या विधानसभेत केवळ दोन आमदार असलेली भाजप अचानक 15 आमदारांच्या संख्येपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (UDP) चे 9 आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे 4, असे एकूण 13 विद्यमान आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, मेघालयमधील 13 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. हे सर्वजण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राज्यातील भाजप नेत्यांनीही यासंदर्भात केंद्रीय पातळीवर चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. टीएमसीच्या संभाव्य गटात माजी मुख्यमंत्री डॉ. मुकुल संगमा यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. 60 सदस्यांच्या मेघालय विधानसभेत सध्या UDP चे 12 आणि TMC चे 4 आमदार आहेत. यापैकी काही आमदारांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे.

मंत्रिमंडळ फेरबदलामुळे वाढला असंतोष

नॅशनल पीपल्स पार्टी (NPP)च्या नेतृत्वाखालील मेघालय डेमोक्रॅटिक अलायन्स सरकारमध्ये सहयोगी असलेल्या UDPमध्ये सप्टेंबर 2025 मधील मंत्रिमंडळ फेरबदलानंतर नाराजी निर्माण झाली. पर्यटनमंत्री पॉल लिंगदोह यांच्या जागी पक्षाध्यक्ष मेटबाह लिंगदोह यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने पक्षातील गटबाजी आणखी तीव्र झाली. 2028 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही अंतर्गत फूट अधिक स्पष्ट होत असल्याचे दिसत आहे.

असं असलं तरी UDP च्या सूत्रांनी भाजपमध्ये जाण्याची शक्यता नाकारली आहे. पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले की, ‘मी याची पुष्टीही करू इच्छित नाही आणि खंडनही करू इच्छित नाही. पक्षात फूट पडायची असेल तर पडेल. पक्षांतरविरोधी कायद्यापासून वाचण्यासाठी पुरेशी संख्या असेल, तर त्यांना कोणीही रोखू शकत नाही.’ दरम्यान, पॉल लिंगदोह यांनी यापूर्वी अशा चर्चांना केवळ अफवा असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांच्याकडे याबाबत पुरेशी माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

भाजपने काय म्हटलं?

मेघालय भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने आमदारांसोबत चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, राज्य भाजप अध्यक्षांनी UDP च्या आमदारांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. मात्र, आता हे आमदार थेट केंद्रीय नेत्यांशी चर्चा करत आहेत. सध्या कोणताही अंदाज व्यक्त करायचा नाही. अंतिम निकालाची वाट पाहू असे भाजप नेत्याने सांगितले. दरम्यान, सध्या मेघालय विधानसभेत भाजपचे अलेक्झांडर लालू हेक आणि सनबोर शुल्लाई हे दोन आमदार आहेत. सनबोर शुल्लाई हे राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ना कसला दिखावा, ना मोठेपणा…दिग्गज क्रिकेटपटूने केला चक्क मेट्रोतून प्रवास, साधेपणाचं कौतुक, Photo Viral
  • Airtel, Jio की Vi, कोण ठरलं नंबर वन? TRAI चा रिपोर्ट समोर
  • सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच…
  • Vastu Shastra : कितीही प्रयत्न करा घरात धनच टिकत नाहीये? मग करा हे तीन सोपे उपाय, आयुष्यच बदलून जाईल
  • थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in