• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मन हेलावून टाकणारी घटना, मॅच सुरु असताना वीज कोसळली अन् 24 वर्षीय खेळाडूचा जागीच मृत्यू, Video Viral

August 7, 2026 by admin Leave a Comment

वीज पडून एका 24 वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, तो खरोखरच हृदयद्रावक आहे. ही घटना दक्षिण थायलंडमध्ये घडली, जिथे एका स्थानिक सामन्यादरम्यान फुटबॉलपटू सोफवान अवे याचा मृत्यू झाला. या घटनेत जवळपास डझनभर इतर खेळाडूही जखमी झाले. व्हिडिओमध्ये मुसळधार पावसात सुरू असलेला फुटबॉल सामना दिसत आहे. अचानक, सोफवानवर वीज कोसळली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. तो खेळाडू जमिनीवर कोसळला आणि त्याला हालचाल करता येत नव्हती. संघातील बाकीचे खेळाडू त्वरीत त्याच्या मदतीला धावले. ‘द इंडिपेंडंट’च्या वृत्तानुसार, गंभीर दुखापतींमुळे सोफवानचा मृत्यू झाला. ही स्थानिक स्पर्धा एफए कप असल्याचे सांगण्यात आले. या स्पर्धेत हौशी आणि थाई-मलेशियन संघही सहभागी होतात. सोफवान या स्पर्धेत सॅमकोल्ट्स (SAMCOLTS) संघाकडून खेळत होता.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, मुसळधार पावसामुळे सामना थांबवायला हवा होता का, ज्यामुळे ही घटना टाळता आली असती, असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे. त्यांनी आयोजकांच्या जबाबदारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मलेशियन वृत्तसंस्था बर्नामाच्या वृत्तानुसार, पोलीस प्रमुख थुन सिरिखुंट म्हणाले, “आपत्कालीन वैद्यकीय पथकाने त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु या घटनेत झालेल्या गंभीर जखमांमुळे पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला.”

A football player was killed and 12 others were injured after a lightning strike hit the field during a match in Thailand. pic.twitter.com/XLAMhPxqgV

— Daily Loud (@DailyLoud) August 6, 2026

वीज थेट सफवानवर पडली आणि तो क्षणार्धात जमिनीवर कोसळला. स्टेडियममध्ये एकच गोंधळ उडाला. सफवानला वाचवण्यासाठी प्रेक्षक आणि इतर उपस्थित लोक घाबरून मैदानाकडे धावले. तातडीने वैद्यकीय पथकाला बोलावण्यात आले आणि सफवानला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

वृत्तानुसार, थायलंडमध्ये वीज पडून होणारे मृत्यू सामान्य आहेत, तरीही सामना थांबवण्यात आला नाही. रोग नियंत्रण विभागाच्या आकडेवारीनुसार, 2020 ते 2024 दरम्यान वीज पडून 283 लोकांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी असूनही, सामना थांबवण्यात आला नाही, ही खरोखरच एक दुःखद बाब आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Salman Khan : ‘बंटवारा 1947’ पाहताच भाईजानने केला खास कॉल, काय म्हणाला सलमान खान ?
  • सेलिब्रेशन असावे तर असे! ना उडी मारली, ना कसा दिखावा, ध्रुव जुरेलने बायसेपवरील टॅटू दाखवला, Video Viral
  • Manoj Jarange : सरकारला धडकी भरवणारी घोषणा! मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, 29 तारखेला काय होणार?
  • मालकाच्या मृत्यूनंतर कुत्र्याने दाखवली निष्ठा; 41 वर्षांपूर्वीचं हे गाणं ऐकताना प्रत्येकजण रडतो
  • मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in