• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मध्य रेल्वेचा खोळंबा, डोंबिवलीत लोकल रुळावरून घसरली; वेळापत्रकाचे तीन तेरा

April 20, 2026 by admin Leave a Comment


रेल्वेवर आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी एक मोठा अपघात झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. डोंबिवली स्थानकाजवळ कळवा कारशेडकडून येणाऱ्या एका रिकाम्या लोकलचा डबा रुळावरुन घसरला. यामुळे सीएसएमटीकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे अनेक प्रवासी ट्रॅकवर उतरुन चालत जाताना दिसत आहेत.

नेमकं काय घडलं?

आज सकाळी ८ च्या दरम्यान ही घटना घडली. कळवा कारशेडमधून एक रिकामी लोकल गाडी कल्याणच्या दिशेने जात होती. त्याचवेळी डोंबिवली आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान या गाडीचा एक डबा अचानक रुळावरून खाली उतरला. सुदैवाने, ही लोकल रिकामी होती. यात कोणताही प्रवाशी प्रवास करत नव्हता. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे मध्य रेल्वेच्या अप मार्गावर म्हणजेच मुंबईकडे जाणाऱ्या लोकलवकर मोठा परिणाम झाला आहे.

यामुळे गाड्यांचा खोळंबा पाहायला मिळत आहे. सध्या अप मार्गावरील ३ गाड्या जागीच थांबल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांना मोठा विलंब होत आहे. तसेच सध्या स्थानकांवर गर्दी पाहायला मिळत आहे. कामावर जाण्याची वेळ असल्याने डोंबिवली, कल्याण आणि ठाकुर्ली स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमली आहे. अनेक लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असून काही गाड्या रद्द करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शक्य तितक्या लवकर वाहतूक पूर्ववत करण्याचे आश्वासन रेल्वेने दिले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sharad Pawar : आज मुख्यमंत्र्यांची सभा, त्याआधी विधानसभा पोटनिवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला बसू शकतो मोठा धक्का
  • TMKOC: पैचान कोन? ‘तारक मेहता..’मध्ये नाकारला जेठालालचा रोल, ‘दादी’बनून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला हा स्टार
  • महिला आरक्षणावरुन संजय राऊतांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, देवेंद्र फडणवीसांचे नात घेत म्हणाले…
  • IMD Weather Alert : राज्यावर गारपिटीचे संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट, तब्बल इतक्या जिल्ह्यात..
  • इथे दीपिकाने गुड न्यूज देताच तिथे ‘धुरंधर 2’ने रचला इतिहास; साऊथ सुपरस्टारच्या चित्रपटाला टाकलं मागे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in