• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

TMKOC: पैचान कोन? ‘तारक मेहता..’मध्ये नाकारला जेठालालचा रोल, ‘दादी’बनून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला हा स्टार

April 20, 2026 by admin Leave a Comment


प्रसिद्ध अभिनेता अली असगर हा'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मध्ये दादीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचला. गेल्या अनेक वर्षांपासून अली असगर हा आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. चला, जाणून घेऊया त्याच्या आयुष्याबाबत नजर टाकूया. (All Photos- Google)

कॉमेडी शोमधून दादीची भूमिका साकारून प्रसिद्ध होण्यापूर्वी अली असगर याने एक प्रतिभावान टीव्ही अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. 'कहानी घर घर की' आणि 'कुटुंब' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तो झळकला होता. त्याच्या दमदार अभिनयाचे नेहमीच कौतुक झालं.

'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मधील दादीच्या भूमिकेमुळे त्याला प्रेक्षकांचं, चाहत्यांच खूप प्रेम मिळालं. मात्र, पडद्यावर स्त्री पात्र साकारल्यामुळे त्याच्या मुलांना शाळेत बराच त्रास सहन करावा लागत असे. त्याने अलीकडेच मनीष पॉलच्या पॉडकास्टमध्ये हा खुलासा केला.

याबाबत बोलताना अली म्हणाला, “एक वेळ अशी आली तेव्हा माझ्या लक्षात आलं, मी फक्त हेच करत होतो. मला पाहणारे लोक म्हणायचे, 'हा वेडा झाला आहे का?'” त्या वेळी 'कॉमेडी सर्कस' शनिवार आणि रविवारी टेलिकास्ट व्हायचा आणि मी दोन्ही वेळेस स्त्री पात्र साकारायचो, असं त्याने नमूद केलं.

लोकप्रिय टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये अली असगरला जेठालालची भूमिका ऑफर झाली होती, पण त्याने ती नाकारली, अशाही बातम्या समोर आल्या होत्या.

TOI ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत अलीने हे देखील सांगितलं होतं की, त्याने सुरुवातीला 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मधील 'दादी'ची भूमिका नाकारली होती. मात्र नकारानंतरही कपिल शर्मानेचत्याला या रोलसाठी राजी केलं, असंही त्याने नमूद केलं.

अली असगरबद्दल बोलायच झाल्यास, त्याने आपल्या कामातून इंडस्ट्रीत स्वतःचे नाव कमावले आहे आणि तो चांगली कमाईही करतो. अहवालानुसार, अली असगरची एकूण संपत्ती सुमारे 40 कोटी रुपये आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • देवेंद्र फडणवीस यांचे चॅलेंज सुप्रिया सुळे यांनी स्वीकारले, थेट म्हटले, मी तयार..
  • इमरान हाशमीची 5 ब्लॉकबस्टर गाणी, जी ऐकताच प्रत्येकजण होतो रोमँटिक, शेवटचं गाणं तर प्रचंड रोमँटिक
  • 2 महिने पोलिसांना चकवा, फक्त एक चूक अन्… मुंबईच्या ड्रग्ज क्वीनचा कसा झाला गेम ओव्हर?
  • Dhurandhar 2: ओटीटीवरही ‘धुरंधर 2’ मालामाल; हमजासाठी कोट्यवधींची डील
  • या चित्रपटांमध्ये अभिनेत्रींनी ओलांडल्या होत्या मर्यादावर! चुकूनही कुटुंबीयांसोबत पाहू नका, आज हे 5 सिनेमा पुन्हा चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in