
सध्या इंटरनेटचं युग आहे. शॉपिंग हा महिलांचा सर्वात आवडता विषय असतो. महिलांना शॉपिंग करायला आवडतं. आता तर शॉपिंग करणं आणखी सोप झालं आहे, कारण आज अनेक ऑनलाईन शॉपिंग साईट्स उदयाला आल्या आहेत. तुम्ही दिवसा, रात्री कधीही या ऑनलाईन शॉपिंग साईट्सवरून तुम्हाला हवी ती गोष्टी हव्या त्या वेळेला ऑर्डर करू शकतात. अशा काही साईट्स आहेत, ज्यावर तुम्ही ऑनलाईन वस्तुची ऑर्डर दिली की ती वस्तू पुढील अवघ्या काही मिनिटांमध्ये तुमच्या घरी हजर असते. त्यामुळे सध्या वस्तुची खरेदीचा पारंपरिक ट्रेड बदलत आहे. लोक दुकानात जाऊन एखादी वस्तू खरेदी करण्याऐवजी या वस्तूंची थेट ऑनलाईन पद्धतीने खरेदी करत आहेत. याचे दोन फायदे आहेत. एक तर म्हणजे अशा साईटवरून तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली तर ती तुम्हाला दुकानातून खरेदी केलेल्या वस्तुच्या तुलनेनं स्वस्त मिळते, तसेच दुकानात जाण्याचे कष्ट देखील वाचतात. त्यामुळे आता अशा ऑनलाईन शॉपिंग साईट्सची लोकप्रियता वाढत आहे.
या ऑनलाईन शॉपिंग साईटचं वैशिष्ट म्हणजे दिवसातून जवळपास 18 तासांपेक्षा अधिक काळ या साईटवरून तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकतात. मेट्रो शहरामध्ये तर नोकरी तीन शिफ्टमध्ये असते, त्यामुळे जे लोक दुपारच्या शिफ्टला काम करतात, त्यांना घरीयेईपर्यंत खूप उशिर झालेला असतो, त्यामुळे ते घरी खाण्यासाठी काही करण्याच्या भानगडीत न पडता ते ऑनलाईन फूड साईटसवरून थेट खाण्याची ऑर्डर देतात.
अनेक महिला देखील ऑफिसमध्ये रात्री उशिरापर्यंत काम करतात, अशावेळी घरी आल्यानंतर त्यांना देखील खाण्यासाठी पदार्थ बनवण्याचा कंटाळा येतो, अशावेळी त्या देखील थेट स्विगी किंवा झोमॅटोसारख्या फूड डिलिव्हरी साईट्सवरून खाद्य पदार्थाची ऑर्डर करतात. याबाबत खुलासा करताना एका डिलिव्हरी बॉयने धक्कादायक माहिती दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार वेफर्स, बिस्किट, बर्गर, पिझ्झा या सारख्या गोष्टी महिला मोठ्या प्रमाणात ऑर्डर करतात, विशेष: रात्री उशिरा या सारख्या गोष्टींच्या ऑर्डरचं प्रमाण वाढतं, यामध्ये सर्वाधिक संख्या ही महिला ग्राहकांची असते, अशी माहिती या डिलिव्हरी बॉयने दिली आहे.
Leave a Reply