• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

“भोळा राहिलो तर भाजपवाले खातील”, शिंदे सेनेच्या धडाडीच्या नेत्याचा पॉलिटिकल पंच, विधानाने एकच खळबळ

August 13, 2026 by admin Leave a Comment


किशोर पाटील, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: तीन पक्ष एकत्र आले की भांड्याला भांडं वाजतंच असा परवलीचा शब्द महायुतीतून कायम ऐकू येतो. पण या पक्षात एकमेकांविषयी फार विश्वास नसल्याचे एका वक्तव्यातून समोर आले आहे. मंत्री गुलाबराव पाटील हे शिंदे सेनेची मुलूख मैदान तोफ म्हणून ओळखल्या जातात. कोणतीही भीडभाड न बाळगता ते खणखणीत भाषण करतात. त्यातून ते अनेक संदेश देतात. खानदेशमध्ये गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे सेनेतील कलगीतुरा लपलेला नाही. त्यातच गुलाबराव पाटील यांच्या पोटातले ओठांवर आले आहे. त्यांनी एक खळबळजनक विधान केले आहे.

कार्यक्रम केला तर, कार्यक्रम होईल

जळगावमध्ये एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी मंचावर भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे सुद्धा होते. त्यांच्या देखत पाटील यांनी खिंड लढवली. जे. टी. महाजन उच्चशिक्षित होते. ते अत्यंत साधे होते आणि त्यांची नाळ शेतीची जुळलेली होती. त्यामुळे त्यांनी साखर कारखाना, सहकारी संस्था यांचे जाळे विणले. जिल्हा दूध संघाच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आपल्याकडे आहेत. दूध संघ चांगले चालवा, कार्यक्रम केला. तर कार्यक्रम होईल (आमदार मंगेश चव्हाण यांना उद्देशून) त्यांनी जोरदार टोला लगावला.

सहकार विभागाचे साखर कारखाने बंद पडतात आणि खाजगी कारखाने चालतात, मंगेश दादा यांचा खाजगी कारखाना कसा चालत होता? साखर कारखाने बंद पडत असल्याने गुलाबराव पाटील यांनी दुःख व्यक्त करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी दूध संघाचे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण यांना टोला लगावला. तुकाराम मुंडे सारखे यांच्यासारखे अधिकारी आले आणि आपलं दूध संघात येणार दूध वाढलं, पनीर कुठेच मिळत नाही, या शब्दात तुकाराम मुंढे यांचा गुलाबराव पाटील यांच्याकडून कौतुक करण्यात आले.

“भोळा राहिलो तर भाजपवाले खातील”

मी भोळा राहीला तर मला भाजपवाले खाऊन जातील. असे मोठं विधान मंत्री गुलाबराव पाटलांनी भाषणात केले. त्यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली. माझ्या तोंडातून काहीही निघत आणि बोलला जातो मग हे टीव्ही वाले काही पण दाखवतात. त्यामुळे मी आता सांभाळून बोलतो, असे मिष्कील वक्तव्य त्यांनी केले तरी अगोदर त्यांनी जे बोलायचे ते बोलून दाखवले.

बँकेकडे लक्ष ठेवा, नाहीतर बँक उचकुन जाईल असा खोचक सल्ला देखील मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यासपीठावर बसलेल्या जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार यांना दिला. दूध संघात असेल किंवा सहकारी संस्थामध्ये यापूर्वीचे अध्यक्ष झाले किंवा सभापती झाले ते किती भोळे होते हे सांगताना मंत्री गुलाबराव पाटलांनी वक्तव्य केला आहे. जळगाव जिल्हा दूध संघात संस्थापक अध्यक्ष तसेच माजी गृहमंत्री जे टी महाजन यांच्या पुतळ्याच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन…
  • घरातील फॅमिली फोटो बदलू शकतो नात्यांमधील आनंद, फोटो लावताना ‘या’ 10 गोष्टी ठेवा लक्षात
  • साखरेच्या दरवाढीमागे इथेनॉल नाही तर ‘ही’ कारणे, सरकारने घेतलेले मोठे निर्णय काय?
  • मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमात सहभागी व्हा, संघाचे प्रचारप्रमुख सुनिल आंबेकर यांचे आवाहन
  • श्रावणातील पुत्रदा एकादशीला चुकूनही करू नका ‘या’ 5 गोष्टी, भात खाण्यापासून तुळस तोडण्यापर्यंत आहे सक्त मनाई

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in