
बांगलादेशची राजस्थानी ढाका येथे आंतरराष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले. या सेमिनारमध्ये भारतही सहभागी झाला. मात्र, यादरम्यान बांगलादेशाने असे काही केले की, मोठा वाद उभा राहिला. भारताने थेट संताप व्यक्त केला. भारताच्या दुखत्या नसवर बांगलादेशाने थेट हात ठेवले. ज्यानंतर भारताचे एक राैद्ररूप बघायला मिळाले. या आंतरराष्ट्रीय सेमिनार दरम्यान एका प्रेजेंटेशनवेळी चक्क काश्मीर पाकिस्तानमध्ये दाखवण्यात आले. थेट पाकिस्तानचा हिस्सा म्हणून दाखवण्यात आले, ज्याने एकच मोठी खळबळ उडाली. भारताने या चुकीच्या नकाशाचा ताबडतोब विरोध केला. अशी गोष्टी अजिबात सहन करणार नसल्याचे सांगत संताप व्यक्त केला. चक्क एका आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये अशी घटना होणे धक्कादायक आहे. ढाकामध्ये बांग्लादेश इंस्टीट्यूट ऑफ इंटरनॅशनल अॅन्ड स्टेटेजिक स्टडीजककडून विदेशाच्या मुद्द्यात सेमिनारचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून बांगलादेशचे माजी राजदूत तारिक ए करीम प्रेजेंटेशन देत होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, प्रेजेंटेशनदरम्यान स्क्रीनवर नकाशा दाखवण्यात आला. या नकाशात जम्मू आणि काश्मीर थेट पाकिस्तानमध्ये दाखवण्यात आले. हा नकाशा पाहताच भारतीय उच्चायोगच्या सेकेंड सचिव पूजा कुमारी झा यांनी हा नकाशा बघताच विरोध केला.
त्यांनी जोरदार विरोध करत सेमिनारमध्ये स्पष्ट केले की, इथे दाखवण्यात आलेला भारताचा नकाशा पूर्णपणे चुकीचा आहे. जम्मू आणि काश्मीर भारताचा अत्यंत महत्वाचा हिस्सा आहे. मला वाटते की, हा नकाशा अजिबात बरोबर नाही. भारताच्या अधिकाऱ्याने विरोध करताच प्रेजेंटेशन करणाऱ्या तारिक ए करीम यांनी म्हटले की, हा फक्त एक सांकेतिक नकाशा आहे. याचा उद्देश सीमा दाखवण्याचा नाहीच. मात्र, भारताने आपला निषेध कायम ठेवला.
गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेश भारताच्या विरोधात भूमिका घेत आहे. हेच नाही तर पाकिस्तानसोबत त्यांची जवळीकता वाढली आहे. बांगलादेशमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यापासून पाकिस्तान आणि त्यांच्यातील संबंध सुधारत आहेत. त्यामध्येच आता थेट भारताच्या नकाशातून त्यांनी जम्मू काश्मीर पाकिस्तानमध्ये दाखवण्याची हिंमत केली.
Leave a Reply