• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतीय हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात, लँडिंगदरम्यान दुर्घटना, थेट दोन तुकडे होऊन..

June 15, 2026 by admin Leave a Comment


भारतीय हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली. शनिवारी सकाळी ही दुघर्टना घडली. आसाममधील जोरहाट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हे विमान उतरत असताना हा अपघात झाला.  हवाई दलाचे AN-32 हे मालवाहू विमान तळावर उतरत असताना कोसळले. हा अपघात इतका जास्त भीषण होता की, अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले. घटनास्थळावरून धूर आणि आगीच्या ज्वाळा निघत होता. विमानाचा अपघात होताच काही वेळातच तातडीने बचाव कार्य राबवण्यात आले. मात्र, हा अपघात नक्की कसा झाला, याबाबत माहिती मिळू शकली नाहीये. या विमान अपघाताचे काही फोटोही पुढे आली आहेत. या फोटोवरून स्पष्ट होते की, हा अपघात किती जास्त भीषण आहे. या अपघातानंतर भारतीय हवाई दलाने एक निवेदनही जाहीर केले.

भारतीय हवाई दलाने जारी केलेल्या निवेदनानुसार, AN-32 हे मालवाहू विमान जोरहाट हवाई दल तळावर अपघातग्रस्त झाले. अपघाताचे कारण आणि विमानात असलेल्या कर्मचाऱ्यांची सद्यस्थिती याबाबतच्या अधिकृत माहितीची सध्या प्रतीक्षा आहे. या अपघाताबद्दल अधिक माहिती मिळू शकत नाहीये. ज्यावेळी विमान अपघात झाला, त्यावेळी नक्की किती जण विमानात होती.

कारण विमानाचा अपघात झाल्यानंतर लगेचच विमानाला भीषण आग लागली. यामुळे विमान असलेले कर्मचारी बाहेर पडू शकले की, नाही याबाबत काही माहिती मिळू शकली नाहीये. या विमानात अपघातात विमान पूर्णपणे नष्ट झालंय. थेट विमानाची दोन तुकडे झाली आहेत. विमान अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तपास यंत्रणाही घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

सध्या भारतीय हवाई दलाकडून विमान अपघात नक्की कसा झाला, याचा तपास केला जात आहे. ज्यावेळी हा विमान अपघात झाला, त्यावेळी काही सैनिक या विमानात असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, यावर हवाई दलाकडून सध्याच कोणती माहिती दिली जात नाहीये. काही वेळात भारतीय हवाई दलाकडून या अपघाताबद्दल अधिकची माहिती ही दिली जाऊ शकते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in