• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतीय विमानांना पाकिस्तानची हवाई हद्द बंदच !, २४ मे पर्यंत मुदतीत झाली वाढ..

April 22, 2026 by admin Leave a Comment


इस्लामाबाद: पाकिस्तानची आणि भारतात पहलगाम हल्ला आणि त्यानंतर झालेले ऑपरेशन सिंदूर यामुळे तणाव कायम आहे. आता पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्रात भारतीय विमानांना लावलेले निर्बंध आता मंगळवारी २४ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने एकमेकांच्या विमानांना आपली हवाई हद्द बंद करण्याची घोषणा केली होती. पाकिस्तानी हवाई क्षेत्र २४ एप्रिल २०२५ पासून भारतीय विमानांना बंद आहे. याला उत्तर म्हणून भारतानेही पाकिस्तानी विमानांच्या प्रवेशावर बंदी घातली असून ती ३० एप्रिल २०२५ पासून लागू आहे.

पाकिस्तानने नोटममध्ये काय लिहिले ?

पाकिस्तानी विमान वाहतूक प्राधिकरणाने ‘नोटीस टू एअरमन’ (नोटम)मध्ये म्हटले आहे की सर्व भारतीय नोंदणीकृत, करारावर घेतलेल्या वाणिज्यिक आणि सैन्य विमानांना २४ मे २०२६ च्या सकाळी पाच वाजेपर्यंत पाकिस्तानी हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यात अनुमती नसणार आहे. ही नोटीस आधीची नोटिसीची कालमर्यादा २४ एप्रिल संपण्याआधी काही दिवसांपूर्वी जारी केली आहे.

भारतीय विमान कंपन्याचे नुकसान –

पाकिस्तानी हवाई हद्दीत भारतीय विमानांना बंदी घातल्याला एक वर्षे झाले आहे. ज्यामुळे भारतीय विमानांना विविध आंतरराष्ट्रीय ठिकाणांवर जाण्यासाठी दीर्घ हवाई मार्गांचा स्वीकार करावा लागत आहे. यामुळे भारतीय विमान कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे. कारण भारतीय हवाई उड्डाण बाजार पाकिस्तानहून किती पट अधिक आहे. भारताने पाकिस्तानी विमानांना २४ एप्रिलच्या सकाळी ५.३० वाजेपर्यंत आपल्या हवाई हद्दीचा वापर करण्यास रोखलेले आहे. या निर्बंधांना आणखी वाढवले जाण्याची शक्यता आहे.

पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर तणाव कायम

पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या विरोधात उचललेल्या अनेक पावलांमुळे तणाव आहे. हे निर्बंध सुरुवातीला २४ मे २०२५ पर्यंत होते. मात्र, त्यास दर महिन्याला वाढवण्यात आले आहे. हवाई क्षेत्राला आधी १९९९ च्या कारगित संघर्ष आणि २०१९च्या पुलवामा हल्ल्यानंतरही बंद करण्यात आले होते.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs CSK Live Streaming : मुंबई-चेन्नई हायव्होल्टेज सामना, पलटणच्या मॅचची वेळ बदलली?
  • सोनं झालं खूपच स्वस्त, एकाच दिवसात चक्क इतकी घसरण, 10 ग्रॅमचा नवा भाव काय?
  • IPL 2026 Points Table : लखनौला पराभूत करत राजस्थान टॉप 2 मध्ये, आरसीबीला मोठा झटका
  • MI vs CSK : मुंबई-चेन्नई सामन्यासाठी सज्ज, रोहित-धोनी खेळणार?
  • शरीरातील पाण्याची कमतरता होईल दूर आणि उष्णतेपासूनही मिळेल आराम, आहारात ‘या’ देसी पदार्थांचा करा समावेश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in