• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात स्वदेशी शक्तीची भर; सागरी सुरक्षेला मिळालं नवं बळ, अचानक नेमकं काय घडलं?

July 14, 2026 by admin Leave a Comment


भारतीय सागरी सुरक्षेसाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी एका स्वदेशी शक्तीची भर पडलीये. सध्या निलगीरी, संधायक आणि अर्नाळा वर्गाच्या युद्धानौका सागरी युद्ध, जलसर्वेक्षण आणि किनारी पाणबुडीविरोधी कारवायामध्ये आघाडीवर आहेत. त्यात आयएनएस दुनागरी, आयएनएनस शोधन, आयएनएस अग्रय आणि आयएनएस महेंद्रगिरी भारतीय नौदलात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे भारताच्या सागरी सुरक्षेला नवे बळ मिळालं आहे.

भारताच्या नौदलावर सुमारे 11,098 किमी लांब किनारा, सुमारे 24 लाख चौरस किलोमीटर,90 टक्के व्यापारी संरक्षणाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आता भारताकडे मोठा ताफा आहे. या ताफ्यात स्टेल्थ फ्रिगेट्स, सर्वेक्षण जहाजे, अर्नाळा श्रेणीची पाणबुडीविरोधी युद्धनौका यांचा समावेश झाला आहे.

आयएनएस दुनागिरी, आयएनएस संधायक, आयएनएस अग्रय या युद्धनौका 21 जून 2026 जून रोजी कोलकात्यात भारतीय नौदलात सामील झाल्या. त्यानंतर 11 जुलै 2026 रोजी प्रोजेक्ट 17A अंतर्गत विकसित करण्यात आलेली INS महेंद्रगिरी ही युद्धनौका सामील झाली. यामुळे हिंदी महासागर आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारताची सामरिक ताकद अधिक भक्कम झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या सर्व युद्धनौका भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने केली आहे. प्रकल्प 17 अ अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या निलगिरी श्रेणीच्या स्टेल्थ फ्रिगेट्स भारतीय नौदलात भरपूर महत्त्वाच्या मानल्या जातात. या युद्धनौका 149 मीटर लांब आणि 6,670 टन वजनाच्या आहेत. या युद्धनौका 28 नॉट्सपर्यंत वेग गाठू शकतात. त्याचबरोबर ताफ्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, हेलिकॉप्टर इत्यादी देखील सज्ज आहेत.

दरम्यान, सर्वेक्षण करणारी जहाजे देखील भारतीय नौदलाची जलसर्वेक्षण क्षमता बळकट करतात. सुमारे 110 मीटर लांब आणि 3400 टन वजनाची जहाजे ही समुद्रतळाचा नकाशा तयार करतात. तसेच नौकानयन नकाशे तयार करणे आणि सागरी माहिती गोळा करतात. यामुळे सागरी व्यापार, ब्लू इकॉनॉमी आणि मित्र राष्ट्रांसोबतच्या जलसर्वेक्षण सहकार्याला चालना मिळते.  आयएनएस संधायक हे या श्रेणीतील चौथे आणि अंतिम जहाज असल्याची सांगण्यात आलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in