• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतीयांनी तुमचे काय बिघडवले? 28 भारतीय असलेल्या जहाजावर भीषण हल्ला, ऐन..

July 25, 2026 by admin Leave a Comment


गेल्या तीन महिन्यांपासून मोठा तणाव इराण आणि अमेरिका यांच्यात आहे. सतत युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम जगाला भोगावा लागत आहे. यादरम्यानच होर्मुज खाडीत झोप उडवणारी घटना नुकताच घडली. इराणच्या समुद्रहद्दीत 28 भारतीय नागरिक असलेल्या जहाजावर मोठा हल्ला करण्यात आला. एलपीजी गॅस टॅंकरवर हल्ला करण्यात आला. तेहरानमधील भारतीय दूतावासाने या हल्ल्याची पुष्टी केली. भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, मोजम्बिकचा झेंडा असलेल्या एलपीजी गॅस टॅंकरवर हल्ला झाला. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वजण सुरक्षित आहेत. होर्मुज खाडीत हा हल्ला झाला. मात्र, हा हल्ला नक्की कोणी केला याबाबत माहिती पुढे येऊ शकत नाहीये. हे जहाज फारस खाडीकडे पुढे सरकत होते, त्यावेळी हा हल्ला झाला.

या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा होर्मुज खाडीतील सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. जगातील 20 टक्के गॅस याच रस्त्याने नेला जातो. मात्र, हाच मुख्य मार्ग आता सुरक्षित राहिला नाही. अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव आहे. मोठ्या प्रमाणात होर्मुज खाडीतून जाणाऱ्या जहाजांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. भारतीय जहाजालाही टार्गेट करून मोठे हल्ले होर्मुज खाडीत झाली.

कोणत्याही परिस्थितीमध्ये होर्मुज खाडी सुरक्षित असणे आवश्यक आहे. होर्मुज खाडीत जहाजांवरील वाढलेल्या हल्ल्यांमुळे स्थिती अधिक गंभीर होत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत आहे. होर्मुज खाडीत जहाजांवर हल्ले झाले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी अगोदरच अमेरिकेने इराणला दिली.

इराण आणि अमेरिका यांच्यात काही मुद्द्यावर एकमत होऊ शकत नाही. इराणवर अमेरिका मोठे हल्ले करत आहे. होर्मुज खाडीत होणाऱ्या हल्ल्यानंतर स्थिती अधिक भयंकर होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी होर्मुज खाडी बंद असल्याने जगात कच्च्या तेलाचे मोठे संकट उभे होते, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव सातत्याने वाढताना दिसले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in