
भाजप नेत्यांची रक्षा खडसे यांच्याबाबतची कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर आता एकनाथ खडसे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
या प्रकरणावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, “मी ऑडिओ क्लिप ऐकली आहे. नवीन भाजप आणि जुनी भाजपमध्ये संस्कृतीचा फरक आहे. चौधरीसारख्या लोकांमुळे भाजपची प्रतिमा खराब होते.”
पुढे ते म्हणाले, “विजय चौधरी हे गेल्या 25-30 वर्षांत दारुच्या धंद्यात आहे. नंदूरबार जिल्ह्यातील दारूमाफीया म्हणून यांचं कुटुंब ओळखलं जातं. पैसे खर्च करावे, यासाठी त्यांना भाजपचे सरचिटणीस केलं. अशा स्वरुपाचं वर्तवणूक, विचार करण्याची प्रवृत्ती आहे.”
महिलांबाबत वापरलेल्या कथित आक्षेपार्ह शब्दांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “रक्षा खडसे, कल्पना पांडे यांच्याबाबत अपशब्द वापरले आहेत. त्यांनी राजीनामा दिला, हे बरे केले. असे अनेक लोक भाजपमध्ये आहेत. यामुळे भाजपची प्रतिमा वाईट होत आहे. भाजपने त्यांची चिंता करण्याची गरज आहे,” असेही खडसे म्हणाले.
Leave a Reply