• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भागो मुंढे आया है… आता दूध का दूध, पानी का पानी, दूधात भेसळ करणाऱ्यांवर जोरदार धाडी, अख्या महाराष्ट्रातील भेसळखोरांची तंतरली

July 10, 2026 by admin Leave a Comment


धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दररोज राज्यातील विविध ठिकाणी छापेमारी केली जात आहे. अनेकांवर कारवाईही केली जात आहे. अशातच आता लातूरच्या औसा तालुक्यातील किल्लारीवाडी येथे दूध भेसळीचा मोठा पर्दाफाश करण्यात आला आहे. नीलकंठेश्वर दूध संकलन व शीतकरण केंद्रावर FDA ने धाड टाकत ही कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

लातूरमध्ये FDA ची मोठी कारवाई

मराठवाड्यात अन्न व औषध प्रशासनाची भेसळविरोधी मोहीम आणखी तीव्र झाली असून, आता लातूर जिल्ह्यातील दूध भेसळीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सेफ फूड, सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत औसा तालुक्यातील किल्लारीवाडी येथील नीलकंठेश्वर दूध संकलन व शीतकरण केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने धाड टाकली. या कारवाईत दुधात भेसळ करण्यासाठी वापरला जाणारा तब्बल 4 हजार 225 किलो Whey Permeate Powder आणि टँकमधील 7 हजार 500 लिटर दूध असा 5 लाख 3 हजार रुपयांचा साठा जागेवरच नष्ट करण्यात आला.

कोल्हापूर कार्यालयाकडून मिळालेल्या टॅक्स इनव्हॉइसच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान Milky Mist, Paras, Lactoprima आणि Sonai कंपनीचा 4 हजार 225 किलो Whey Permeate Powder साठा आढळून आला. या पावडरची किंमत 2 लाख 25 हजार 550 रुपये होती. याशिवाय टँकमधील 7 हजार 500 लिटर मिश्रित दुधाची किंमत 2 लाख 77 हजार 500 रुपये होती. दुधात भेसळ करण्यासाठी या पावडरचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संपूर्ण साठा जनआरोग्याच्या हितासाठी जागेवरच नष्ट करण्यात आला.

प्राथमिक तपासात या केंद्रातून दररोज हैदराबादमधील दिव्या एंटरप्रायझेस, सरस्वती डेअरी आणि श्रीपदा डेअरी येथे दूध पुरवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दूध संकलन केंद्राचे मालक व्यंकट शिवाजी माने, कर्मचारी भाऊराव सुग्रीव भोसले, विजय माणिक रुबदे तसेच बालाजी ट्रेडर्स, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर या Whey Permeate Powder पुरवठादाराविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहिसरमध्येही दूध भेसळ करणाऱ्यांवर कारवाई

मुबईतील दहिसर पूर्व येथील एका ठिकाणी गुन्हे शाखा युनिट 12 व अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई केली. अमूल, गोकुळसह नामांकित कंपन्यांच्या दूध पिशव्यांमध्ये पाणी मिसळून भेसळ केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या कारवाईत सुमारे 470 लिटर भेसळयुक्त दूध, रिकाम्या पिशव्या व साहित्य जप्त केले आहे. गुन्हे शाखेकडून एका आरोपीला अटक करण्यात आली असून 39 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
  • मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
  • मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
  • नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
  • पत्नी नको त्या अवस्थेत दिसली, थेट प्रियकरासोबतच लावून दिलं लग्न, नवऱ्याने तो निर्णय का घेतला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in