• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बोगस परीक्षेने महाराष्ट्रात खळबळ, संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक; नेमकं प्रकरण काय?

August 9, 2026 by admin Leave a Comment


ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही महिन्यांपासून देशात होणाऱ्या परीक्षांबाबत धक्कादायक खुलासे होत आहेत. नीट पेपरफुटीनंतर महाराष्ट्रात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. विमानतळावरील ग्राउंड स्टाफ पदाच्या भरती परीक्षेवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ झाल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. NIA Aviation Services Pvt. Ltd. कडून ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र परीक्षा घेण्यासाठी आवश्यक DGCAची परवानगी आणि अधिकृत कागदपत्रं दाखवण्यात आली नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. परीक्षेच्या नोटिफिकेशनवर IBPSचं नाव असल्याने विद्यार्थ्यांनी IBPSच्या नावाच्या गैरवापराबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.

संभीजीनगरमध्ये काय घडलं?

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी 600 रुपये भरल्याचं सांगितलं असून केंद्रावर सीट नंबर, चेकिंग कर्मचारी आणि आवश्यक व्यवस्था नसल्याचाही आरोप आहे. आता NIA Aviation Services ने C2 Explorer कंपनीला परीक्षा घेण्याचं टेंडर दिलं असून आपण केवळ थर्ड पार्टी म्हणून परीक्षा घेत असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलं. परीक्षा रद्द करणं किंवा पैसे परत करणं आपल्या अधिकारात नसल्याचंही आयोजकांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या गोंधळानंतर पोलीस केंद्रावर दाखल झाले आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात आली.

C2X कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, NIA कडून C2 एक्सप्लोरर या कंपनीला परीक्षा आयोजित करण्याचे टेंडर देण्यात आले होते. अपेक्षित होतं की C2 एक्सप्लोर चा कुणीतरी अधिकृत प्रतिनिधी या ठिकाणी यावा आणि त्याच्याकडे सगळे डॉक्युमेंट असावेत मात्र तो आला नाही त्यामुळे हा सगळा दंगा झाला. C2 एक्सप्लोरर या कंपनीचे रेगुलर काम करणारे आम्ही नाही लोकलच्या मुलांना बोलून पर डेच्या हिशोबाने एक्झाम घेतली जाते. परीक्षा रद्द करून पैसे रिफंड करण्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत. जर विद्यार्थ्यांना रिफंड पाहिजे असेल तर नियमानुसार NIA जर कॉन्टॅक्ट केला तर त्यावर सोल्युशन निघेल. आम्ही पेपर वाटप करू आणि नंतर ते पेपर एवढाच आमचा या ठिकाणी रोल आहे.

विद्यार्थ्यांचा गंभीर आरोप

ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, NIA Aviation Services Pvt. Ltd ची परीक्षा होती, परीक्षा घेणारी कंपनी एकदम बोगस आहे. CSA ग्राउंड स्टाफ ची परीक्षा होती, DGCA च यांच्याकडे लेटर पाहिजे होतं आम्ही यांना मागितली तर त्यांच्याकडे नाही. C2X या कंपनीकडे सुद्धा NIA च लेटर नाही. जे आम्हाला नोटिफिकेशन आहे त्यावर IBPS च नाव आहे यांनी IBPS चा सुद्धा गैरवापर केला आहे. 600 रुपये देऊन येथे विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

पुढे बोलताना विद्यार्थ्यांनी म्हटले की, आम्ही त्यांना विचारलं NIA चा स्टँप कुठे आहे, आम्हाला त्यांनी बोगस लेटर दाखवलं. NIA ने तुम्हाला पेपर घेण्यासाठी परवानगी दिली आहे याचा लेटर आम्ही मागितलं. इथं आम्हाला सीट नंबर दिला नाही, चेकिंग साठी स्टाफ दिला नाही, बाहेर बोर्ड सुद्धा लावला नाही. पाचशे मीटरच्या अंतरावर 2 सेंटर ठेवले आहेत. CBT पेपर आहे म्हणून सांगितलं होतं, मात्र तसं काहीही नाही. जानेवारी जाहिरात ही परीक्षा निघाली होती, आता आम्ही परीक्षा देणार नाहीय ज्यांनी अर्ज केले होते त्यांना प्रत्येकाला दहा हजार रुपये दिले पाहिजे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव
  • मोठी बातमी! लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र होणार? वन नेशन वन इलेक्शनबाबत मोठी अपडेट!
  • Tapsee pannu : तुम्हाला फार मजा येत्ये का ? कंगनाचं नाव काढताच भडकली तापसी पन्नू, फटकारत म्हणाली..
  • मराठी सक्तीचा वाद चिघळला, रिक्षा-टॅक्सी चालकाची थेट हायकोर्टात धाव, याचिकेत आरोप काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in