• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बिहारच्या पोटनिवडणुकीत ट्विस्ट; भाजप उमेदवाराने घेतला अर्ज मागे, अचानक नेमकं काय घडलं?

July 10, 2026 by admin Leave a Comment


भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनी काही महिन्यांपूर्वी आमदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघातील जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत अचानक मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अभिषेक कुमार सिन्हा यांनी माघार घेतली आहे. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मतदारसंघातून ऐनवेळी भाजप उमेदवाराने माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

भाजप उमेदवार अभिषेक कुमार सिन्हा यांनी पत्रकार परिषद घेऊन अर्ज माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी अभिषेक कुमार यांनी कौटुंबिक कारणातून निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. अभिषेक कुमार सिन्हा यांनी म्हटले की, ‘मी काही वेळापूर्वीच भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांना एक पत्र दिलं आहे. त्यांना दिलेलं पत्र वाचून दाखवत आहे. भाजपने मला बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत एनडीएचा उमेदवार म्हणून निवडले होते. मी पक्षाच्या केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वाचे आभार मानतो. मी सर्वांना नम्रपणे कळवू इच्छितो की, कौटुंबिक कारणामुळे मला विधानसभा पोटनिवडणूक लढवणे शक्य होणार नाही. परंतु मी पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. आधीसारखं पक्षाची प्रामाणिक सेवा करत राहीन’.

प्रशांत किशोर पोटनिवडणुकीच्या रिंगणात 

बांकीपूर पोटनिवडणुकीत लढतीची जोरदार चर्चा सुरू आहे. या पोटनिवडणुकीच्या जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर रिंगणात उतरले आहेत. त्यातदरम्यान भाजप उमेदवार अभिषेक कुमार सिन्हा यांनी अर्ज मागे घेतल्याने पोटनिवडणुकीतील राजकीय समीकरण बदललं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in