
मुंबईच्या पायधुणी परिसरात धक्कादायक घटना घडली. बिर्यानी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर अनेकांनी कलिंगडावर बहिष्कार टाकला. उन्हाळ्याच्या हंगामात गार गार कलिंगड खाण्याची मजाच वेगळी आहे. मात्र, बिर्यानी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्याने चार जणांना जीव गमवावा लागला. यादरम्यानच कलिंगडावर रासायनिक प्रक्रिया झाल्यानेच ही घटना घडली का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात सर्व बाजूने चाैकशी केली जात आहे. विषबाधा नक्की बिर्यानीतून झाली की कलिंगडातून याचा तपास सुरू आहे. यादरम्यानच या प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येत आहे. या कुटुंबाला ज्यावेळी त्रास सुरू झाला, त्यावेळी नक्की काय घडले हे त्यांच्यावर सर्वात प्रथम उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. यासोबतच अजून एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
मृतांच्या शरीरात पेनकिलरसदश पदार्थ आढळल्याची शक्यता आहे. शवविच्छेदनादरम्यान या संशयित पदार्थ आढळल्याची माहिती मिळत आहे. मात्र, फॉरेन्सिक अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल. सामान्य अन्नदूषितमुळे इतक्या वेगाना मृत्यू होणे दुर्मिळ असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉ. झेथ कुरेशी यांनी याबाबत मोठा खुलासा केला. ज्यावेळी या कुटुंबाला त्रास होत होता, त्यावेळी त्यांच्या उपचारासाठी सर्वात अगोदर डॉ. झेथ कुरेशी पोहोचले होते.
झेथ कुरेशी यांच्या कुटुंबासोबत त्यांचे बोलणे झाले होते. डॉ. झेथ कुरेशी यांनी म्हटले की, ज्यावेळी मी पहिल्यांदा तिथे पोहोचलो होतो. त्यावेळी ते लोक अशा स्थिती नव्हते की, ते मला काही बोलू शकतील किंवा सांगू शकतील. त्यांची तब्येत खूप जास्त खराब होती. माझे बोलणे अब्दुला यांच्यासोबत झाले. दुपारी 1 ते 2 दरम्यान माझे त्यांच्यासोबत बोलणे झाले होते. त्यावेळी मी त्यांना विचारले होते की, तुम्ही हे कलिंगड कधी खाल्ले. त्यांनी मला स्वत: सांगितले होते की, ज्यावेळी त्यांनी हे कलिंगड खाल्ले त्यावेळी त्यांनी स्वत: कलिंगड कट केले होते.
त्यावेळीच त्यांनी चार जणांनी कलिंगड खाल्ले होते. अर्धे उरलेले कलिंगड त्यांनी फ्रीजमध्ये ठेवले. ते काहीच प्रतिसाद देते नव्हते. फक्त डोळे त्यांची उघडी होती. पती पत्नी आणि त्यांच्या दोन मुली होत्या. त्यामधील त्यांच्या एका मुलीची स्थिती गंभीर होती. मुलीला आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. पण रस्त्यामध्येच तिने जीव सोडला. बाकी जे तीन होते त्यांना आम्ही जेजे रूग्णालयात शिफ्ट केले. तिथे त्यांच्यावर काहीवेळ उपचार करण्यात आली पण काही वेळात त्यांचेही निधन झाले.
Leave a Reply