• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बिझनेस करावा तर असा.. 2 वर्षांपासून काम बंद तरी 350 कोटींचा टर्नओव्हर; कतरिना कैफ कुठून कमावतेय इतका पैसा?

July 16, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत अनेक कलाकार येतात आणि जातात, मात्र काही कलाकार आपल्या मेहनत, टॅलेंट आणि दूरदृष्टीच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण करतात. कतरिना कैफ हे त्यापैकीच एक नाव आहे. अथक मेहनत, स्टाईन, उत्तम डान्स, मनमोहक हास्य, सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी कतरिना आता केवळ अभिनेत्री राहिलेली नाही, तर ती एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही ओळखली जाते. तिने तिच्या मेहनतीने खास ओळख बनवली, जी फक्त स्टारडम पुरती मर्यादित नाही. बॉलिवूडची सौंदर्यवती असलेल्या कतरिना कैफचा आज, 16 जुलै वाढदिवस असतो. यास दिवशी तिच्या फिल्मी प्रवासासोबतच तिच्या संपत्ती, कमाईचे स्रोत आणि बिझनेस साम्राज्यावर एक नजर टाकूया.

‘बूम’पासून सुरू झालेला प्रवास, बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपर्यंत पोहोचला

कतरिना कैफने 2003 साली ‘बूम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीचा प्रवास सोपा नसला तरी ‘मैने प्यार क्यों किया?’ आणि ‘नमस्ते लंडन’ यांसारख्या चित्रपटांनी तिला घराघरात पोहोचवलं. त्यानंतर तिने शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केले. ‘राजनीती’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. सलमान खानसोबतची ‘टायगर’ फ्रँचायझी तर बॉक्स ऑफिसवर मोठी हिट ठरली.

कतरिना कैफचे नेटवर्थ

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफची एकूण संपत्ती सुमारे 250 कोटी रुपये आहे. चित्रपट, जाहिराती, सोशल मीडिया प्रमोशन आणि स्वतःच्या बिझनेसमधून ती कोट्यवधी रुपयांची कमाई करते. ती आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘मेरी ख्रसमस’ या चित्रपटासाठी तिने जवळपास 15 कोटी रुपये मानधन घेतलं होतं. तर ‘टायगर 3’साठी तिचे मानधन 15 ते 21 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितलं जातं.

जाहिराती आणि सोशल मीडियातूनही मोठी कमाई

चित्रपटांव्यतिरिक्त कतरिनाच्या उत्पन्नाचा मोठा भाग ब्रँड एंडोर्समेंटमधून येतो. ती अनेक मोठ्या आणि लक्झरी ब्रँड्सचा चेहरा आहे. एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी ती अंदाजे 6 ते 7 कोटी रुपये शुल्क घेते. तर इंस्टाग्रामवरील पेड प्रमोशनसाठी ती सुमारे 72 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत मानधन आकारते असं म्हटलं जातं.

‘के ब्युटी’ने बदललं चित्र

कतरिना कैफने 2019 मध्ये ‘के ब्यूटी’ (Kay Beauty) या स्वतःच्या ब्यूटी ब्रँडची सुरुवात केली. नायकासोबत भागीदारीत सुरू केलेला हा ब्रँड आज तिच्या यशस्वी व्यावसायिक प्रवासाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. रिपोर्ट्सनुसार, या ब्रँडचा रेव्हेन्यू हा 350 कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे कतरिना केवळ अभिनेत्री म्हणून नाही, तर बॉलिवूडमधील यशस्वी सेलिब्रिटी उद्योजिका म्हणूनही ओळखली जाते.

आलिशान घरांपासून महागड्या कारपर्यंत संपत्तीचा थाट

कतरिना कैफकडे मुंबईतील जुहू परिसरात समुद्रकिनाऱ्याचे विलोभनीय दृश्य दिसणारं, आलिशान 4 बीएचके अपार्टमेंट आहे. तेथे ती पती विकी कौशलसोबत राहते. याशिवाय लंडनमध्येही तिच्या मालमत्ता असल्याचे सांगितले जाते. लग्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखल्या जाणाऱ्या कतरिनाकडे महागड्या कार्सचे शानदार कलेक्शन आहे. त्यामध्ये रेंज रोव्हर वोग एलडब्ल्यूबीसारख्या आलिशान गाड्यांचा समावेश आहे.

आई म्हणूनन नव्या भूमिकेचा आनंद

वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केलं. बराच काळ डेट केल्यावर राजस्थानमध्ये त्यांनी शाही सोहळ्यात विवाह केला. गेल्या वर्षी या दोघांना मुलगा झाला. त्याचं नाव त्यांनी विहान असं ठेवलं आहे. सध्या कतरिना चित्रपटांपासून काही काळ दूर असली तरी ती कुटुंबासोबत राहून मातृत्वाच्या सुंदर प्रवासाचा आनंद घेत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in