• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बायकोसमोर शायनिंग मारायला गेला अन् एक चूक घडली, हनीमूनच्या दिवशीच… ती पाहतच राहिली

June 23, 2026 by admin Leave a Comment


लग्न हा प्रत्येक तरुण आणि तरुणीच्या जीवनातील महत्त्वाचा काळ असतो. या काळात त्यांना अनेक नव्या गोष्टींचा सामना करावा लागतो. तसेच लग्नानंतर हनीमून हा प्रत्येक जोडप्यासाठी जीवनातील सुवर्णकाळ असतो. पण काही वेळा एक छोटीशी चूक संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. ग्रीसमधील समुद्रकिनाऱ्यावर हनीमूनसाठी गेलेल्या या जोडप्याबरोबरही असेच घडले. नव्या नवरीच्या डोळ्यांसमोर तिची संपूर्ण दुनियाच उद्धवस्त झाली आहे.

काय घडले?

‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुलेमान सरिफे (२७ वर्षे) आपल्या पत्नीसोबत हनीमूनसाठी ग्रीसला गेला होता. हनीमूनच्या तिसऱ्या दिवशी त्याने आपल्या पत्नीसमोरच एका उंच जागेतून समुद्रात उडी घेतली. कातळावर पडल्याने त्याला गंभीर इजा झाली. त्याच्या मानेच्या आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर सुलेमानला तुर्कीच्या फेथिये येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. ११ दिवस तो जीवन आणि मृत्यूशी झुंजत राहिला. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, मात्र ६ जून रोजी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या लग्नाला केवळ दोन आठवड्यांपूर्वी झाले होते.

हे कपल लग्नाच्या तिसऱ्या दिवशी हॉटेलमधून निघून फिरायला गेले होते. पती आणि पत्नी म्हणून ते दोघे पण फिरायला निघाले होते. दोघेही एका उंच टेकडीवर पोहोचले होते. ते दोघेही वरुन समुद्र पाहात होते. तेवढ्यात तरुणाने वरुन थेट समुद्रात उडी मारली. पण खाली असलेला दगड त्याने पाहिली नाही. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. ते पाहून त्याच्या पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तातडीने मदत मागितली आणि पतीली रुग्णालयात दाखल केले.

सुलेमान कोण होता?

सुलेमान तुर्गुटलु हा छोट्या कसब्यात लोणचं बनवणाऱ्या कारखान्यात काम करत होता. त्याचे अंतिम संस्कार कुटुक मिनारे मशिदीत करण्यात आले आणि त्यांना अलासेहिर येथील नवीन स्मशानभूमीत दफन करण्यात आले. ही घटना ग्रीसमध्ये एका ब्रिटिश तरुणाने कोणताही विचार न करता समुद्रात उडी मारल्यामुळे झाली. या एका उडीमुळे त्याचा मृत्यू झाला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in