
पालघर : वसईच्या भुईगाव समुद्र किनारी एक अजब प्रकार समोर आला आहे. एका महिलेने मुलांना खिडकीत उभे करून एक जीवघेणी स्टंटबाजी केली आहे. या महिलेने समुद्रकिनारी थरारक पद्धतीने कार चालवली आहे
मिळालेल्या माहितीनुसार 16 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता हा प्रकार घडला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला कार चालक दिसत आहे. तिने आपल्या मुलांना दारांच्या खिडकीत उभे केले आहे.
विशेष म्हणजे बिचवर इतरही काही लोक आहेत. लोक आनंदात बिचवर फिरत असताना दुसरीकडे ही महिला मात्र आपल्या मुलांना खिडकीमध्ये उभे करून स्टंट करत आहे. भरधाव वेगात ती कार चालवत आहे.
या सर्व प्रकाराचा एका जागरूक नागरिकाने व्हिडीओ काडून समाज माध्यमावर व्हायरल केला आहे. अचानक भरती आली किंवा कार जर वाळूत फसली किंवा कार पलटी होऊ झाली तर मुलांचा तसेच त्या महिलेला दुखापत होण्याची शक्यता आहे.
वसई, नालासोपारा, विरार समुद्र किनाऱ्यावर असे अनेक अपघात होतात.अनेक जण स्टंटबाजित भरतीच्या पाण्यात बुडतात. अनेक कार पाण्यात बुडल्याच्याही घटना घडल्या आहेत. तटरक्षक दलाचे जवान अशा स्टंटबाजांना अनेकवेळा आडवितात पण तरीही आपला जीव धोक्यात घालून स्टंट सुरूच आहेत. अशा लोकांवर तत्काळ कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे




Leave a Reply