• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बांधकामाच्या ठिकाणी दुर्घटना झाली तर…मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण असणार जबाबदार? मार्गदर्शक सूचना जारी

July 6, 2026 by admin Leave a Comment


मुंबईत गेल्या तीन दिवसापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. तीन दिवसांपासून मुंबईत अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडत आहेत. काही ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तर मानखुर्दमध्ये घरे पडून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बांधकामांच्या ठिकाणीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने मुंबई महापालिकेने खबरदारी घेतली आहे. महापालिकेने बिल्डर, कंत्राटदारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. बांधकामांच्या ठिकाणी काय काळजी घ्यायची याची माहिती दिली आहे. या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेशही महापालिकेने दिले आहेत.

बांधकाम स्थळांच्या सुरक्षे बाबत मार्गदर्शक सूचना

सध्याचे हवामान आणि ताशी 70 ते 80 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विकासक, वास्तुविशारद, परवानाधारक सर्वेक्षक (LS), कंत्राटदार, प्रकल्प व्यवस्थापक आणि बांधकाम स्थळांशी संबंधित अभियंते यांना खालील सुरक्षाविषयक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.

1) बांधकामासाठी उभारलेले तात्पुरते मचान / परांची (स्कॅफोल्डिंग), सुटे व खुले साहित्य, क्रेनवरील साहित्य, संरक्षण भिंतींसह (कंपाऊंड वॉल्स) बांधकाम स्थळी असणारे पत्रे, साचाबांधणी (फॉर्मवर्क) तसेच सर्व तात्पुरत्या संरचनांची सखोल तपासणी करून त्या स्थिर, सुरक्षित आणि भक्कम स्थितीत असल्याची खात्री करावी. इमारतीच्या वरच्या मजल्यांवर, गच्चीवर (टेरेस) आणि उंचावरील प्लॅटफॉर्मवर असलेले सुटे व खुले साहित्य त्वरित हटवावे किंवा योग्यप्रकारे बांधून सुरक्षित करावे.

2) कोणत्याही बांधकाम स्थळी अव्यवस्थित किंवा निष्काळजीपणे कामकाज होऊ देऊ नये. सर्व कामाचे नियोजन, देखरेख आणि अंमलबजावणी सुरक्षितरित्या व पद्धतशीरपणे करावी. खोदकाम करण्यात आलेल्या बांधकाम स्थळांवर योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि त्यावर काटेकोरपणे देखरेख ठेवावी.

3) टॉवर क्रेन, मटेरियल होईस्ट, बांधकाम लिफ्ट, सुरक्षा जाळ्या (सेफ्टी नेट्स) आणि उचलण्याची उपकरणे (लिफ्टिंग इक्विपमेंट) यांची स्थिरतेच्या दृष्टीने तपासणी करावी.

हवामानामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास उचलण्याची कामे (लिफ्टिंग ऑपरेशन्स) आणि उंचावरची सर्व कामे तात्काळ थांबवावीत. तसेच, बांधकाम सुरू असलेल्या परिसरात प्रतिबंधित सुरक्षा क्षेत्र (Exclusion Zone) कायम ठेवावे.

4) सर्व कामगारांनी निर्धारित वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (PPE) तसेच उंचावर काम करताना आवश्यक ‘फॉल प्रोटेक्शन’चा वापर करणे बंधनकारक आहे. संपूर्ण बांधकाम स्थळाची तात्काळ सुरक्षा तपासणी करून सर्व असुरक्षित बाबी विलंब न करता दुरुस्त कराव्यात.

5) हवामान परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे आणि परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. सर्व संबंधितांनी या सुरक्षाविषयक सूचनांकडे अत्यंत तातडीची बाब म्हणून पाहावे. सुरक्षा नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

कामगार, परिसरातील रहिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. सर्व विकासकांनी या सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचनांची अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन लागू असलेल्या सर्व सुरक्षाविषयक नियमांचे आणि उत्कृष्ट बांधकाम पद्धतींचे काटेकोरपणे पालन करावे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सूर्याने जे कमावलं ते श्रेयसने एका झटक्यात गमावलं, ‘सरपंच साहब’च्या नेतृत्त्वात भारतीय संघाला मोठे नुकसान; नेमकं काय घडलं?
  • Supriya Sule | एकाच पावसाने महाराष्ट्र पॅरालाइज! सुप्रिया सुळेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; नेमकं काय म्हणाल्या?
  • ‘मिर्झापूर’मधील ही अभिनेत्री श्वेता तिवारीला देते टक्कर, 41 व्या वर्षी दिसते 20 ची, फोटो पाहून..
  • आभाळ फाटणार, नाशिकमध्ये ढगफुटीचे संकट, 3 वाजल्यापासून हायटाईड, मुख्यमंत्र्यांचा थेट गंभीर इशारा..
  • ऐन पावसात निवडणुकीचा ‘धुरळा’ उडणार; कोणत्या 3 जागांवर पोटनिवडणुका होणार? अधिकृत माहिती समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in