• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बटाटा आणि पनीरचं सारण भरून बनवा स्वादिष्ट भरलेली ढोबळी मिरच्या, झटपट जाणून घ्या रेसिपी

July 27, 2026 by admin Leave a Comment


ढोबळी मिरची आरोग्यासाठी प्रचंड लाभदायक आहे. डॉक्टर देखील ढोबळी मिरची खाण्याचा सल्ला देत असतात, तर जाणून घ्या कशी बनवायची बटाटा आणि पनीरचं सारण भरुन कशी बनवायची ढोवळी मिरची. सांगायचं झालं तर, ढोबळी मिरची ही एक अशी भाजी आहे जी अनेक पदार्थांमध्ये घालता येते. त्यामुळे पदार्थाची चव दुप्पट होते. तिचा वापर सहसा पिझ्झा, पुलाव आणि सँडविचमध्ये केला जातो. पण जर तुम्हाला काहीतरी वेगळं आणि चविष्ट बनवायचे असेल, तर भरलेल्या शिमला मिरच्या हा एक उत्तम पर्याय आहे. बटाटे आणि पनीरचे मसालेदार सारण भरून तयार केलेला हा पदार्थ खूप चविष्ट लागतो. तुम्ही तो रात्रीच्या जेवणासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा कोणत्याही विशेष प्रसंगासाठी बनवू शकता. तो पोळी, पराठा किंवा डाळ-भात सोबत खूप चविष्ट लागतो.

काही लोकांना साधी ढोबळी मिरची आवडत नाही, पण ती भरून बनवल्यास तिची चव पूर्णपणे बदलते. मसाले आणि बटाटा-पनीरच्या मिश्रणामुळे ती अधिक चविष्ट लागते. त्यामुळे जाणून घ्या काही मिनिटांत तयार होणारी ही मिरची बनवण्याची सोपी पद्धत…

लागणारे साहित्य

ढोबळी मिरची – 250 ग्रॅम, बटाटे (मध्यम आकाराचे) – दोन, पनीर – 100 ग्रॅम, कांदा – एक, ओवा – अर्धा चमचा, हळद – गरजेनुसरा, लाल मिरची पूड – अर्धा चमचा, आले-लसूण पेस्ट – तीन चमचे, धणे पूड – एक चमचा, जिरे – एक चमचा, गरम मसाला पूड – एक चमचा, आमचूर पूड – अर्धा चमचा, मीठ – चवीनुसार…

भरलेल्या ढोबळ्या मिरच्या

कृती: सर्वप्रथम ढोबळ्या मिरच्या पाण्याने धुवून कोरड्या कापडाने पुसून घ्या. नंतर कांदा, आलं आणि लसूण यांची पेस्ट तयार करा. त्याच वेळी, पनीर किसून एका भांड्यात ठेवा. यानंतर, कुकरमध्ये दोन बटाटे उकडून घ्या आणि थंड झाल्यावर त्यांची साल काढून हाताने चांगले मॅश करा. आता एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे आणि ओवा परतून घ्या. नंतर त्यात कांदा, आले आणि लसूण यांची पेस्ट घाला. तसेच गरम मसाला पावडर आणि हळद घाला. मसाल्यांचा छान सुगंध येईपर्यंत मंद आचेवर परतून घ्या.

यानंतर किसलेले पनीर आणि उकडलेले बटाटे घाला आणि मग धणेपूड, लाल तिखट, आमचूर पूड घालून चांगले मिसळा. हे मिश्रण मंद आचेवर दोन ते तीन मिनिटे शिजू द्या. त्यानंतर गॅस बंद करा. यानंतर ढोबळ्या मिरचीचा वरचा भाग कापून आतील बिया काढून टाका.

आता, एक एक करून त्यात बटाटा आणि पनीरचे मिश्रण भरा आणि कापलेला भाग पुन्हा वर ठेवा. नंतर एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात भरलेल्या मिरच्या टाका, झाकण ठेवून मंद आचेवर सुमारे 12 – 15 मिनिटं शिजू द्या. आता, मिरच्यांचा वरचा भाग काढून त्यावर किसलेले पनीर पसरवा आणि चपाती, ब्रेड किंवा नान सोबत गरमागरम सर्व्ह करा.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in