• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बंडखोर खासदारांच्या खासदारकीची प्रक्रिया पुर्ण होऊच शकत नाही’, बड्या नेत्याचं खळबळजनक विधान

June 23, 2026 by admin Leave a Comment


उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या परिषदेवेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी संजय जाधव, संजय दिना पाटील यांच्यासह अनेकांबाबत आक्रमक भाषेत वक्तव्य केले. महत्त्वाचा बाब म्हणजे त्यांनी कायदे व्यवस्थेवर थेट प्रश्न उपस्थित केला.

बंडखोरी करणाऱ्या खासदारांच्या पक्ष प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, कोणाचीही खासदारकी जाणार नसून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यावर आज संजय राऊत यांनी थेट टीका केली. ते म्हणाले, “कायदेशीर कारवाई पूर्ण होऊच शकत नाही… तुमचं शासन आहे म्हणून तुम्ही मान्यता देत आहात… अन्यथा अशा पक्षफुटींना मान्यताच नाही… तुम्ही कायद्यावर दबाव आणून आसाममध्येही हेच केलं, आता महाराष्ट्रातही तेच केलं.”

दरम्यान, संजय पाटील यांनी केलेल्या काही वक्तव्यांवरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसून आले. संजय पाटील यांनी बंदुकीची धमकी दिली, “माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबाकडे वाईट नजरेने बघितलं तर हॉस्पिटलमध्ये जावं लागेल,” असे ते म्हणाले. त्यावर संजय राऊत यांनी त्यांना थेट आव्हान दिले. “मी लागतो नादाला, चल, तुझ्या नादाला लागतो मी. बंदूक दाखवू नको, नाव घेऊन बोलतो भोXXX. शिवसैनिकांना बंदूक दाखवू नकोस. मी इथेच आहे. बंदूक दाखवतोस साल्या. मी भांडूपलाच आहे, शिवसैनिकांना बंदूक दाखवतो गद्दार माणूस. ५० कोटी गिळले नाहीत का मग गप्प बस. परत बंदुकीची भाषा करायची नाही. बंदूक तुझ्या ढुंगणात घालीन. झेड प्लस सुरक्षा काढून ये. कायदा-सुव्यवस्था आहे की नाही मिस्टर फडणवीस? सोड रे एकनाथ शिंदे, चल,” अशा भाषेत संजय राऊत बोलले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ketan Agrawal Case: खळबळजनक अपडेट! लग्नासाठी राजेशाही थाट ठेवणाऱ्या केतनची होणाऱ्या पत्नीने का केली हत्या? कारण तरी काय?
  • मोठी बातमी! शिंदे-ठाकरे एकत्र या… शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक; राजकीय समीकरणं बदलणार?
  • केतन अग्रवाल प्रकरणात पोलिस तपासात धक्कादायक खुलासा, होणारी पत्नीच निघाली दगाबाज, तब्बल 8 जणांवर..
  • Raja Shivaji OTT Release: बॉक्स ऑफिसवरील टाईम ओव्हर, ‘राजा शिवाजी’ सिनेमा ओटीटीवर धडकणार, कधी आणि कुठे येणार पाहता?
  • Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in