• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फ्लिपकार्टवर Moto G77 Power चा सेल सुरू, अशाप्रकारे मिळवा 3 हजार 200 रुपयांचा बंपर डिस्काउंट

July 14, 2026 by admin Leave a Comment


मोटोरोला कंपनीने मागच्या आठवड्यात त्यांचा नवीन मोटो जी77 पॉवर हा स्मार्टफोन लाँच केला आहे. तर 13 जुलैपासून हा नवीन मोटोरोला फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच कंपनीने जी-सिरीजचा भाग असलेला हा नवीन फोन चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध केला आहे. ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या रंगांचा फोन खरेदी करता येईल. यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ऑक्टा-कोअर प्रोसेसर आहे. फोनमध्ये 7000mAh क्षमतेची बॅटरी असून, कंपनीच्या दाव्यानुसार ही बॅटरी 59 तासांपर्यंत टिकते. ऐवढचं नाहीतर हा फोन खरेदी करताना तुम्हला बंपर डिस्काउंट देखील मिळणार आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण हा फोन ऑफर नंतर कोणत्या किमतीत खरेदी करता येणार आहे ते जाणून घेऊयात.

भारतात मोटो जी77 पॉवरची किंमत

या नवीन फोनच्या 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 25 हजार 999 रूपये आहे. तसेच तुम्ही हा फोन खरेदी करताना फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डचा वापर करत असाल तर तुम्हाला 3 हजार 200 ची सूट मिळू शकते. तुमच्याकडे कार्ड नसल्यास, HDFC आणि ॲक्सिस बँक कार्डवर तुम्हाला 2 हजार रूपयांची सूट मिळू शकते. फ्लिपकार्ट एसबीआय बँक कार्डवर तुम्हाला 1 हजार 300 रूपयांची सूट मिळू शकते. हा फोन Pantone Fuchsia Red, Pantone Impenetrable, Pantone Laurel Green आणि Pantone Nautical Blue या रंगांमध्ये उपलब्ध असेल. या किमतीत हा मिड-रेंज फोन सॅमसंग गॅलेक्सी A26 5G, IQOO Z11x 5G आणि वनप्लस नॉर्ड CE6 लाइट यांसारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करतो.

मोटो जी77 पॉवर स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले: मोटोच्या या फोनमध्ये 6.72-इंचाचा फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले असून, त्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आणि टच सॅम्पलिंग रेट 120Hz पर्यंत आहे. तसेच हा फोन 1050 nits पर्यंतच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

ओएस : हा नवीनतम ड्युअल-सिम मोटोरोला फोन अँड्रॉइड 16 वर आधारित हॅलो यूआयवर चालतो.

चिपसेट: या फोनमध्ये 6nm वर आधारित मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी ARM माली G57 MP2 GPU वापरण्यात आला आहे.

कॅमेरा सेटअप : फोनच्या कॅमेऱ्यात मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असून, त्यात 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी LYT-600 सेन्सर आणि 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. सेल्फीसाठी तर फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. याशिवाय, यात 2K/30fps व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा देखील आहे.

बॅटरी: या फोनमध्ये 7000mAh क्षमतेची बॅटरी असून, त्याला 30W वायर्ड चार्जिंग आणि 6W वायर्ड रिव्हर्स चार्जिंगचा सपोर्ट आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharashtra News LIVE : आजपासून मनोज जरांगे पाटील यांचं शेवटचं निर्णायक आंदोलन
  • तलावाचा रंग बदलतोय, चीनने नेपाळला केलं अलर्ट, कुठल्याही क्षणी फुटेल सरोवर, भारतालाही महापूराचा धोका?
  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
  • पतीच्या मोबाइलमध्ये दुसऱ्या महिलेचा फोटो… एअर इंडिया कर्मचाऱ्याच्या पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, भाऊ परदेशातून परतला
  • बेबी, शोना, आई मिस यू सो मच, अन्.. लेक्चरर नेहाला संपवणाऱ्या पतीचे आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे धक्कादायक चॅट समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in