• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बेबी, शोना, आई मिस यू सो मच, अन्.. लेक्चरर नेहाला संपवणाऱ्या पतीचे आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे धक्कादायक चॅट समोर

August 29, 2026 by admin Leave a Comment


Jalandhar Crime News: पंजाबत्या जालंधर येथील चर्चीत लेक्चरर नेहा हत्याकांड प्रकरणी मोठे धक्कादायक खुलासे समोर येत आहे. पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत असताना त्यांच्या हाती मुख्य आरोपी (नेहाचे पती) उमंग बस्सी आणि त्याची गर्लफ्रेंड सतपाल याने खासगी व्हाट्सएप चॅट समोर आले आहेत. तब्बल 206 पानांच्या व्हाट्सएप चॅटमध्ये फक्त त्यांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल नाही तर, त्यांच्या खासगी योजना, मिटिंग्स आणि लग्नाबद्दल देखील धक्कादायक सत्य समोर आलं आहे. उमंग याची पत्नी, तर सतपाल हिचा नवरा दोघांच्या नात्यातील मोठा काटा असल्यामुळे त्यांना दोघांना संपवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला. याबद्दल मोठं गुपित देखील समोर आलं आहे.

पोलिसांच्या तपासात असं देखील समोर आलं आहे की, दोघांनी ओळख लपवण्यासाठी स्वतःच्या मोबाईलमध्ये एकमेकांचे फोन नंबर खोट्या नावाने सेव्ह केले होते. सतपाल कौर हिने उमंग याचा नंबर ‘तानवी’ आणि ‘आ’ नावाने सेव्ह केलेला, उमंग याने गर्लफ्रेंडचा नंबर ‘सतपाल’ नावाने सेव्ह केलेला. चॅटमधून दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम समोर आलं आहे. दोघे एकमेकांना ‘बेबी’ आणि ‘शोना’ म्हणून बोलायचे आणि सतत एकमेकांना ‘आय लव्ह यू शोना’, ‘यू आर इन माय माइंड एन्ड सोल’ असे भावूक मेसेज करायचे.

15 जानेवारीच्या चॅटमध्ये एकमेकांना संपवण्याचा प्रयत्न

15 जानेवारी रोजी चॅटमधून असं समोर आलं आहे की, सतपाल आणि उमंग यांनी त्यांच्या जोडीदाराला संपवण्याचा कट पूर्वीच रचलेला. चॅटमध्ये सतपाल तिच्या नवऱ्याला संपवण्याबद्दल बोलताा दिसत आहे. पुढे म्हणते, ‘उमंग, यू नो एव्हरिथिंग… यानंतर सतपाल हिने उमंग याला शांत राहण्यासाठी सांगितलं…’

24-25 जानेवारीला लग्न, मुलं आणि भविष्याबाबत चर्चा

चॅटमधील संवादांवरून असं दिसून येतं की, 24 आणि 25 जानेवारीच्या सुमारास लग्न करण्याबाबत त्या दोघांमध्ये स्पष्ट घाई होती. सतपाल हिने मेसेज पाठवून म्हटलं होतं, “माझ्या मते, आपण लग्न करूया.” उमंगने सांगितलं की, तो लवकरच आपल्या आईला या नात्याबद्दल कल्पना देईल. त्यांनी आपल्या सध्याच्या वैवाहिक जीवनातून बाहेर पडून एकत्र राहण्याबाबत, लग्नानंतर मुलांना नवीन कौटुंबिक वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत करण्याबाबत आणि मुलांच्या भविष्याबाबत सविस्तर योजना आखल्या होत्या.

दोघांमध्ये होते शारीरिक संबंध…

मिळालेल्या माहितीनुसार, या चॅट्समध्ये त्या दोघांमधील शारीरिक संबंधांचाही उल्लेख आढळतो. 25 जानेवारीच्या एका चॅटमध्ये उमंग आणि सतपाल यांनी एकमेकांपासून दूर राहणं कठीण असल्याचं व्यक्त केलं होतं; त्यांनी “लवकरात लवकर एकत्र येणं” आणि “तुझ्याशिवाय मला अस्वस्थता जाणवत आहे,” अशा आशयाचे मेसेज पाठवले होते. सध्या सतपाल कौर पोलीस कोठडीत आहे. तिचा पती विशाल शर्मा यांनीच हे चॅट्स सार्वजनिक केले असून, त्यांनी असा दावा केला आहे की, यातील 99% संदेशांमध्ये आपापल्या जोडीदारांपासून वेगळं होण्याच्या आणि त्यांची हत्या करण्याच्या कटाचे संकेत मिळतात. सध्या याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारला थेट इशारा, ‘मुंबईचा बी प्लॅन’ तयार; काय घडतंय?
  • मनोज जरांगे यांची उपोषणाआधीच सरकारकडे सर्वात मोठी मागणी, थेट सरकारलाच दिलं चॅलेंज
  • मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
  • Nepal Flood: नेपाळच्या महाप्रलयात आतापर्यंत 626 जणांचा मृत्यू, 1924 बेपत्ता, 320 भारतीयांचा पत्ता नाही
  • Nepal flood update: नेपाळ पुराबाबत मोठी अपडेट! चीनने लपवली माहिती, लोकांशी बोलण्यासही मनाई

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in