• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फोन दरवाढीनंतर भारतीय बाजारात मोटोरोलाचा 12 जीबी रॅम असलेला ‘हा’ फोन कमी किमतीत झाला लाँच

May 21, 2026 by admin Leave a Comment


मोटोरोलाने भारतात Moto G37 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. तर हा फोन कंपनीच्या जी-सिरीज लाइनअपचा एक भाग आहे. यातील प्रमुख फिचर्समध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर, 5200mAh बॅटरी आणि अँड्रॉइड 16 यांचा समावेश आहे. चला तर मग आजच्या लेखात या फोनची किंमत किती असेल, तो विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल आणि या डिव्हाइसमध्ये कोणती फिचर्स असतील? ते जाणून घेऊयात. या हँडसेटचा एकच व्हेरिएंट लाँच करण्यात आला आहे, जो 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजसह येतो. या व्हेरिएंटची किंमत 13 हजार 999 रूपये असेल. या फोनची विक्री 25 मे पासून कंपनीच्या वेबसाइटवर, तसेच फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोअर्सवर सुरू होईल. हा फोन 25 मे पासून ग्राहकांसाठी विक्रीस उपलब्ध होणार आहे. या किंमतीत मोटोरोलाचा नवीन बजेट फोन realme P4 Lite 5G, Samsung M06 5G, Ai+ Nova 2 5 आणि realme Narzo 100 Lite 5G सारख्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करेल.

Moto G37 फिचर्स

ऑपरेटिंग सिस्टम: हा ड्युअल-सिम फोन Android 16 वर चालतो.

स्क्रीन: या हँडसेटमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 120Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1050 nits पर्यंतच्या पीक ब्राइटनेससह 6.6-इंचाचा HD+ LCD स्क्रीन आहे. हा फोन कॉर्निंग गोरिला ग्लास 7i च्या संरक्षणासह येतो.

प्रोसेसर: या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 प्रोसेसर वापरला आहे. व्हर्च्युअल रॅममुळे फोनमधील रॅम 12GB पर्यंत वाढवता येते आणि मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा: या फोनमध्ये मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि त्यासोबत 2-इन-1 लाईट सेन्सर आहे. तसेच सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे.

कनेक्टिव्हिटी: या फोनमध्ये 5G, Wi-Fi 5, 4G LTE, ब्लूटूथ व्हर्जन 5.4, GPS, A-GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB टाइप-C पोर्ट आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर
  • तीन नवजात बालकांचा मृत्यू, आमदार रवी राणा यांचा डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप..
  • 86 हजार 622 कोटींचं बिल थकीत, कंत्राटदार आर्थिक अडचणीत; शिवतीर्थावर घेणार राज ठाकरेंची भेट
  • IND vs SL: यशस्वी जयस्वालचा माज खपवून घेतला जाणार नाही, भारतीय कोचकडून थेट वॉर्निंग
  • Drishyam 3: विजय साळगावकरचा शेवटचा डाव, अजय देवगणचा ‘दृश्यम: द कन्क्लुजन’; दोन भागांनी वाढवलेलं गूढ आता संपणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in