• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फोटोग्राफी आणि व्हिडिओसाठी DSLR पेक्षा कमी नाहीत ‘हे’ 5 स्मार्टफोन

May 30, 2026 by admin Leave a Comment


भारतीय बाजारपेठेत नवनवीन ‍फिचर्स असलेले फोन लाँच होत असतात. स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन कंपन्या त्यानुसार फोन सादर करतात. तर अशातच काही स्मार्टफोनचे कॅमेरे इतके पॉवरफूल आहेत की ते आता थेट डीएसएलआर कॅमेऱ्यांना स्पर्धा देत आहेत. 2026 मध्ये लाँच झालेले प्रीमियम कॅमेरा फोन्स, जसे की विवो एक्स 300 अल्ट्रा, सॅमसंग गॅलेक्सी एस26 आणि शाओमी 17 अल्ट्रा या फोन्समध्ये कॅमेरा क्वॉलिटी उत्तम आहे.

हे फोन्स आता केवळ सामान्य फोटोग्राफीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर प्रोफेशनल व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि सिनेमॅटिक शूटिंगमध्येही या फोन्सचा वापर केला जात आहे. मोठे सेन्सर्स, 200-मेगापिक्सेल कॅमेरे, 8के व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि ॲडव्हान्स झूम सिस्टीम यांसारखी वैशिष्ट्ये या उपकरणांना खास बनवतात. जर तुम्हाला मोठे जड डीएसएलआर कॅमेरा सोबत घ्यायचा नसेल, तर हे पाच स्मार्टफोन्स तुमच्यासाठी उत्कृष्ट पर्याय ठरू शकतात. चला तर मग या फोन्सबद्दल जाणून घेऊयात.

Vivo X300 Ultra : या फोनमध्ये 200-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 200-मेगापिक्सलचा पेरिस्कोप लेन्स आहे. यात झाईस ऑप्टिक्स, गिम्बल स्टॅबिलायझेशन, 8के रेकॉर्डिंग आणि डॉल्बी व्हिजन एचडीआरची सुविधा आहे. यात एक्सटर्नल झूम लेन्सलाही सपोर्ट आहे. हा फोन डीएसएलआरसारखा पॉवरफूल कॅमेरा अनुभव देतो. तर या फोनची किंमत 1 लाख 59 हजार 999 रूपये आहे.

Oppo Find X9 Ultra: या फोनमध्ये 200-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ड्युअल पेरिस्कोप झूम लेन्स आणि हॅसलब्लॅड कलर कॅलिब्रेशन आहे, ज्यामुळे प्रोफेशनल दर्जाचे फोटो मिळतात. हा फोन ओ-लॉग2 रेकॉर्डिंग, सिनेमॅटिक एलयूटी आणि 8के व्हिडिओ रेकॉर्डिंगलाही सपोर्ट करतो. कॅमेऱ्यावर लक्ष केंद्रित करणारा हा फ्लॅगशिप फोन डीएसएलआर-सारखी फोटोग्राफी आणि सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी देण्यास सक्षम आहे. तर या फोनची किंमत 1 लाख 69 हजार 999 रूपये आहे.

Samsung Galaxy S26 Ultra: या फोनमध्ये कॅमेऱ्यापासून ते एआय (AI) पर्यंत, हा एक अष्टपैलू फोन आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस26 अल्ट्रामध्ये 200-मेगापिक्सेल सेन्सर, ड्युअल टेलीफोटो लेन्स आणि एक प्रगत ऑटोफोकस प्रणाली आहे. होरायझन लॉक, 8के व्हिडिओ, एचडीआर10+ आणि सुपर स्टेडी रेकॉर्डिंग यांसारखी वैशिष्ट्ये फोटो आणि व्हिडिओ दोन्हींची गुणवत्ता लक्षणीयरीत्या वाढवतात. हा एक प्रीमियम स्मार्टफोन आहे जो 2026 मध्ये दैनंदिन फोटोग्राफीसाठी डीएसएलआर कॅमेऱ्यांशी स्पर्धा करतो. तर या फोनची किंमत 1 लाख 30 हजार 999 रूपये आहे.

Xiaomi 17 Ultra : हा फोन देखील एका पॉवरफूल कॅमेरा सेटअपसह येतो. यामध्ये 1-इंचाचा 50-मेगापिक्सेल सेन्सर, 200-मेगापिक्सेलचा कंटीन्युअस झूम लेन्स आणि लायका-ट्यून्ड कॅमेरा सिस्टीम आहे. डॉल्बी व्हिजन एचडीआर रेकॉर्डिंग आणि अल्ट्रा स्लो-मोशन व्हिडिओसारखी वैशिष्ट्ये याला आणखी खास बनवतात. हा एक फ्लॅगशिप कॅमेरा फोन आहे जो अनेक वापरकर्त्यांसाठी डीएसएलआर कॅमेऱ्याची जागा घेऊ शकतो. तर या फोनची किंमत 1 लाख 39 हजार 999 रूपये आहे.

iPhone 17 Pro Max : आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये 4x पेरिस्कोप झूम लेन्स, लिडार स्कॅनर आणि ॲडव्हांस स्टॅबिलायझेशनसह ट्रिपल 48-मेगापिक्सेल कॅमेरा सिस्टीम आहे. प्रोरेस रॉ, डॉल्बी व्हिजन एचडीआर आणि ॲपल लॉग 2 सारखी व्हिडिओ वैशिष्ट्ये याला कंटेंट क्रिएटर्ससाठी एक उत्तम पर्याय बनवतात. हा फ्लॅगशिप कॅमेरा फोन डीएसएलआर-सारखी फोटो आणि व्हिडिओ गुणवत्ता देतो. तर या फोनची ‍ किंमत 1 लाख 49 हजार 900 रूपये आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai Rain Update | प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी!
  • Dhurandhar 2 : ओटीटीवर ‘धुरंधर 2’ची जादू पडली फिकी; ‘या’ धमाकेदार सिनेमाने टाकलं मागे
  • मुख्यमंत्री विजय यांचा मंदिरांबाबत मोठा निर्णय; चाहत्यांकडून होतंय कौतुक
  • Lock Up Season 2 : सलमान-संजयवरून विचारला नको तो प्रश्न, रितेश देशमुखचा चेहराच उतरला, भडकून म्हणाला..
  • Rohit Sharma-Virat Kohli : परफॉर्म करा हक्काने वर्ल्ड कप टीममध्ये या, फक्त 3 चान्स, रोहित-विराटला ही अग्निपरीक्षा द्यावीच लागेल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in