• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

July 22, 2026 by admin Leave a Comment


राजधानी दिल्लीत सध्या कॉकरोज जनता पार्टीकडून आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलन करत आहेत. 21 जुलै राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी पोलिसांना राहुल गांधी यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. मात्र काही काळानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे. अशातच आज या घटनेबाबत राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. याबाबत जाणून घेऊयात.

मोदींच्या घरापर्यंत का गेलात?

राहुल गांधी यांनी म्हटले की, ‘मोदींच्या घरापर्यंत गेलो त्याची दोन कारणं आहेत. हिंदुस्थानचे विद्यार्थी रस्त्यावर आहेत. तर विरोधकांनाही रस्त्यावर आलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे, आमची नॅचरल स्पेस पार्लमेंट आहे. पंतप्रधान निवासाला जाण्यापूर्वी विरोधक स्पीकरकडे गेले. त्यांना आम्ही सांगितलं हा मुद्दा आहे. आम्हाला त्यावर बोलू द्या. चर्चा करू द्या. स्पीकर म्हणाले मी सरकारला विचारतो. हा सरकारचा निर्णय असतो की स्पीकरचा? आम्ही म्हटलं ठीक आहे. तुम्ही विचारा. पण त्यानंतर काहीच चर्चा होऊ दिली नाही.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ‘धर्मेंद्र प्रधान हे एक सिम्बॉल आहे. विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने छळलं त्याचं सिम्बॉल आहे. त्यामुळे सिम्बॉल हटवला पाहिजे. आम्हाला ते माहीत आहे. त्यांची बॅकग्राऊंड माहिती आहे. आम्हाला देशाला संदेश द्यायचा आहे, अशा माणसाला हटवलं आहे. आम्हाला वाटतं हा मध्यवर्ती मुद्दा आहे. त्यावर निर्णय आला पाहिजे. आम्हाला बदल हवा आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठीच आम्ही मोदींच्या घरासमोर आंदोलन केलं.

समाजाचं आवाज बुलंद करायचा आहे – राहुल गांधी

आम्ही विद्यार्थी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देत आहोत. माझ्या तोंडातून काल रक्त येतं होतं. आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहोत. जितेंद्र सिंह या चर्चेत इरेलव्हंट आहे. चर्चा सोपी आहे. आमच्या मागण्या स्पष्ट आहेत. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे. ज्यांनी मारहाण केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि मोदींनी माफी मागितील पाहिजे. या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत. माझं कर्तव्य लोकांचा आवाज बुलंद करण्याचं आहे. विद्यार्थी असो, तरुण असो की शेतकरी असो त्यांचा आवाज बुलंद करणं हे माझं काम आहे. त्यांच्या वेदनांना वाचा फोडणं आहे. मला पंच बसला ही मोठी गोष्ट नाही. ही काही समस्या नाही. अजून पंच खायला मी तयार आहे.

पोलीस म्हणाले सरकारला हटवा…

पुढे बोलताना राहुल गांधी यांनी सांगितलं की, ‘मला माझ्या सुरक्षेची चिंता नाही. पोलिस मला फरफटत घेऊन गेले. पण माझ्या कानात सांगत होते या सरकारला हटवा. खरंच. मी राजस्थानचा आहे. यांना हटवा. आम्ही केवळ वर्दी घालून आलो आहोत. दुसरा म्हणत होता, मी हरियाणाचा आहे. त्यांना हटवा. हे वास्तव आहे. त्या बिचाऱ्यांना फक्त ऑर्डर फॉलो करायची असते.’



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in