
जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. मागील 4 दिवसांपासून जरांगे यांचं उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर सरकारचे प्रतिनिधी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी एकच धावाधाव करत आहेत. मराठा आंदोलन तापलं असताना दुसरीकडे ओबीसी आंदोलकांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने जाण्याचा निश्चय केला आहे. आम्ही 1001 टक्के मुंबईच्या दिशेने निघालो आहोत, असा दावा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला. एकाच वेळी राज्यात दोन समाजाने आंदोलनाचा नारा दिल्याने सरकारची डोकेदुखी वाढल्याचा दावा करण्यात येत आहे.
ओबीसी आंदोलक पुण्यात पोहोचले. परंतु त्यांना ओबीसींचा एल्गार मोर्चा अडवला. ओबीसींचा मोर्चा अडवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी अडवल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी हाकेंनी फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘आम्हाला अटक करा. आमच्यावर लाठीचार्ज करा. जेलमध्ये टाका. आमचं आरक्षण संपवा. आम्ही 1001 टक्के मुंबईच्या दिशेने निघालो आहोत. आम्ही रस्त्यावर येऊन थांबलो आहोत. आमचं घर कुठं, आम्ही उभे कुठे…आमची माणसं आल्यावर आम्ही मुंबईच्या दिशेने निघू. सरकार आम्हाला मोजत नाही. आमचं आरक्षण टिकवत नाही. आमचं म्हणणं ऐकायला तयार नाहीत, असा आरोप हाके यांनी केला.
‘आमचं आरक्षण संपवलं, तसं आमचं आंदोलन संपवण्याचं काम सुरू आहे. आम्ही पुढे जाऊ. आमच्या हक्क आणि अधिकारांची लढाई आहे. आम्ही संघर्ष करू. रस्त्यावर येण्यास कोणी मजबूर केलं. आमचं सरकारने ऐकलं नाही. त्यामुळे आम्ही रस्त्यावर आलो आहोत. मुख्यमंत्री आमचं ऐकत नाही. मनोज जरांगेंना दिवसांतून 10 वेळा फोन करतात. संजय शिरसाट यांनी 250 वेळा कॉल केल्याचे मनोज जरांगेंनी सांगितले. चौथी नापास, शिवराळ भाषा, संविधानाची तत्वे पायदळी तुडवणारा माणूस आहे, अशा शब्दात हाके यांनी टीका केली.
ओबीसी आंदोलनात फूट
एकीकडे लक्ष्मण हाके यांनी मुंबईत आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. परंतु या आंदोलनावरून बबनराव तायडे यांनी युटूर्न घेतला आहे. ओबीसी आंदोलक बबनराव तायडे म्हणाले, ‘लक्ष्मण हाके यांचा आजच्या ओबीसी मोर्चाच्या मागण्या स्पष्ट नाहीत. लक्ष्मण हाके यांच्या मोर्चाच्या मागण्या स्पष्ट नसल्याने आजच्या मोर्चात राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभागी नाही. आजच्या हाके यांच्या ओबीसी मोर्चाचा आमचा पाठिंबा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply