• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फक्त 10 रुपयांमध्ये घरच्या घरी करा पार्लरसारखा पेडिक्युअर, जाणून घ्या ‘ही’ सोपी ट्रिक्स

June 2, 2026 by admin Leave a Comment


आपल्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा स्वतःची काळजी घ्यायला विसरतो. ऊन , धूळ आणि सततच्या हालचालींमुळे आपले हाता सोबत पायसुद्धा काळवंडतात . आता व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्याला स्वतःची काळजी घेता येत नाही, त्यामुळे खास वेळ काढून पार्लरमध्ये जायला मिळत नाही. पण आता तुम्हाला आम्ही तुमच्यासाठी स्वस्तात मस्त घरगूती उपाय घेऊन आलो आहोत, ज्याने तुम्हाला घरच्या घरी पेडिक्युअर करता येईल तेही फक्त 10 रूपयांत. त्यातच यामध्ये जास्त वेळ देखील वाया जात नाही. तुम्ही पायांच सौंदर्य वाढवू शकता

घरीच परफेक्ट पेडिक्युअर कसे करावे?

साहित्य:

कोमट पाणी

शॅम्पू

लिंबाचा रस

मीठ

क्युटिकल क्रीम किंवा ऑलिव्ह ऑईल

घरी पेडीक्योर करण्याचा सोपा मार्ग

एका मोठ्या टबमध्ये कोमट पाणी भरा.

आता त्यात सौम्य शॅम्पू, लिंबाच्या रसाचे 2 ते 3 थेंब आणि एक चमचा मीठ मिक्स करा.

आता या टबमध्ये तुमचे दोन्ही पाय त्यात किमान 5 ते 10 मिनिटं बुडवून ठेवा.

यानंतर पाय‍ स्वच्छ पुसून घ्या. नखांवर क्युटिकल क्रीम लावून घ्या. जर तुमच्याकडे क्युटिकल क्रीम नसेल तर ऑलिव्ह ऑईल सुद्धा वापरू शकता.

आता नखांना लावलेली क्रीम किंवा ऑईल पुसून घ्या. डेड स्किन म्हणजेच क्युटिकल्स जी नखांना चिकटलेली असते ती क्युटिकल च्या मदतीने काढा. आतां चांगल स्क्रब घ्या आणि त्याने पाय छान स्क्रब करून घ्या.

अशा प्रकारे पाय स्वच्छ केल्यास, काळवंडलेले डाग सहजपणे निघून जाऊ शकतात आणि त्वचा मऊ होऊ शकते.

पेडिक्युअर करण्याचे फायदे?

पेडिक्युअर केल्याने पायांचे सौंदर्य वाढते. पायावर जमा झालेली मृत त्वचा काढून निघून जाते. त्यासोबतच पायांचा काळपटपणा आणि कोरडेपणा दूर होतो.

पेडिक्योर करताना पायांना मसाज व स्क्रब केला जातो ज्याने रक्ताभिसरण चांगले राहते.

नियमित पेडिक्युअर केल्याने टाचा मऊ होतात आणि त्यांना भेगा पडत नाहीत.

पायांची दुर्गंधी आणि घाम कमी होतो. याशिवाय नखांची चमकही वाढते.

 

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लाजा सोडलेल्या पोरी… मराठी अभिनेत्रीने बोल्ड शूट करताच नेटकरी संतापले
  • मराठा ओबीसीमध्ये दुरावा निर्माण करणे बंद करा.. मनोज जरांगे पाटील संतापले…
  • Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप, सणासुदीच्या काळात शटडाऊन, तारखा पाहा अन्यथा फेरी वाया जाईल
  • मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
  • भीषण अपघात, स्विफ्ट कार डिवायडर ओलांडून इनोव्हा कारवर आदळली, दोन आमदार जखमी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in