
मुंबईतील वांद्रे परिसरात घडलेल्या एका भीषण अपघाताने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आठ वर्षांचा अंश रविंद्र गुप्ता रविवारी दुपारी रस्ता ओलांडत असताना भरधाव इनोव्हा क्रिस्टाने त्याला धडक दिली. या धडकेत 8 वर्षाच्या लेकराचा जीव गेला. अंशचे वडील शेंगदाणे विकायचे. बलाढ्य श्रीमंत महिलेने अंशला धडक दिली. त्यात अंशचा जीव गेला. पोलिसांनी मेघा रावल या 44 वर्षीय महिलेला अटक केली. मात्र, त्यानंतर डोक्यात मुंगा जाणारा प्रकार उघडकीस आला. तिसरीत शिकणारा अंश रविवारी घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. वांद्रे इथल्या सेंट अँड्र्यू चर्चजवळील बागेच्या परिसरातून तो जात असताना अपघात झाला. महबूब स्टुडिओजवळील जॉन बॅप्टिस्ट रोडवर तो रस्ता ओलांडत असताना इनोव्हा क्रिस्टाने त्याला धडक दिली. नागरिकांनी तातडीने त्याला त्याच कारमधून होली फॅमिली रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
मेघा रावल या बलाढ्य श्रीमंत आहे. आता त्यांच्या कुटुंबियांनी नवा कारनामा केला. मेघा रावल गाडी चालवत असताना फोनवर बोलत होत्या, त्यावेळीच अंशला चिरडले. त्यातच आता रावल कुटुंबियांनी थेट मेघा रावल हिला वाचवण्यासाठी थेट साक्षीदाराला विकत घेण्याचा प्रयत्न केला. मेघा रावल ही फिटनेस कोच आहे. रावल कुटुंबिय बलाढ्य श्रीमंत आहेत. त्यामध्येच मेघाला वाचवण्यासाठी रावल कुटुंबियांनी थेट अपघाताचा साक्षीदार संदीप सिंह याला विकत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मेघा रावल हिच्या कुटुंबाकडून प्रत्यक्षदर्शी असलेल्या संदीप सिंह याला जबाब बदलण्यासाठी मोठी ऑफर देण्यात आली. संदीप सिंह याने त्याचा जबाब बदलावा, याकरिता मोठी प्रयत्न रावल कुटुंबाकडून केली जात आहेत. याबाबत खुलासा स्वत: संदीप सिंह याने केला. साक्षीदाराला विकत घेण्याचा प्रयत्न रावल कुटुंबाकडून करण्यात आला. आता पोलिस यांच्याविरोधात नक्की काय कारवाई करतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मेघा रावल हिची कार खूप जास्त वेगात होती.
मोबाईलवर ती बोलत होती. त्यामुळे अंश पुढे आला तरीही ती काहीच करू शकली नाही. त्यामुळे थेट कारने अंशला चिरडले. उद्या अंशचा वाढदिवस असताना कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातानंतर मेघा रावल हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आता मेघाला वाचवण्यासाठी थेट साक्षीदारालाच विकत घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मेघा रावल हिच्याविरोधात कलम 105,281,125 भारतीय न्याय संहितेनुसार सहकलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
Leave a Reply