• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पेपरफुटी रोखण्यासाठी आता आणखी कठोर कायदा, केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार, थेट कॅबिनेटमध्ये दुरुस्ती विधेयक

July 24, 2026 by admin Leave a Comment


नीटचा पेपर फुटल्याने देशभरात त्याचे पडसाद उमटले आहेत. तब्बल 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यानंतर तरुण रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या पाच दिवसापासून उग्र निदर्शने सुरू आहेत. तर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल 33 दिवस उपोषण केलं आहे. दिल्लीतच नव्हे तर देशभरात या पेपरफुटीविरोधात आंदोलनं होत आहेत. विद्यार्थ्यांच्या या आक्रोशाची गंभीर दखल घेत सरकारने आता मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकार आजच्या कॅबिनेटमध्ये पेपरफुटीला आळा घालण्यासाठी आणखी कठोर कायदा करण्यासाठीचं दुरुस्ती विधेयक आणणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीत पेपर लीकबाबतचा कायदा आणखी कठोर करण्यासाठी दुरुस्ती विधेयक आणलं जाणार आहे. सार्वजनिक परीक्षा (अनुचित मार्गांचा प्रतिबंध) अधिनियम, 2024 (The Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024) हा कायदा 21 जून 2024 पासून लागू आहे. हा कायदा आणखी कठोर केला जाणार आहे. आज 1 वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीत हा कायदा आणखी कठोर करण्यासाठीचं दुरुस्ती विधेयक आणलं जाणार आहे. त्यामुळे या विधेयकात नेमकं काय असणार आहे? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

वांगचुक यांनी उपोषण सोडलं

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं. मध्यरात्री त्यांनी उपोषण सोडलं. त्यांच्या काही मागण्यांवर केंद्र सरकारने आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं. रात्री केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन वांगचुक यांची भेट घेतली. यावेळी वांगचुक यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. वांगचुक यांना सरकारचा निरोप दिल्यानंतर त्यांनी वांगचुक यांनी उपोषण सोडलं.

उपोषण सुटलं, आंदोलन नाही?

दरम्यान, वांगचुक यांनी उपोषण सोडलं असलं तरी आंदोलन मात्र अद्याप थांबलं की नाही? याबाबत संभ्रम आहे. आज दुपारी सीजेपीचे नेते याबाबतची भूमिका स्पष्ट करतील. त्यानंतरच आंदोलनाबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नेपाळ दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती, नागरिकांना काय केलं आवाहन?
  • मी तुला दोन बॅट देईन…! सरफराज खानने पाचव्या दिवशी केशाराला दिली विचित्र ऑफर, पण का?
  • ८ ते १० तास बैठे काम करताय ? हार्टला का आहे धोका ? डॉक्टरांनी सांगितले…
  • Shweta Tiwari : आधी संताप, आता म्हणाली थँक्यू… श्वेता तिवारीने राज ठाकरेंचे मानले आभार; काय घडलं नेमकं?
  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरी गाठणार का? कर्णधार गिलने एका वाक्यात सांगून टाकलं की…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in