• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पेट्रोल पंपावरील गर्दी कमी करण्यासाठी बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय; फुलारी यांनी दिली मोठी अपडेट

May 27, 2026 by admin Leave a Comment


राज्यात डिझेल टंचाईने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. रात्रभर पेट्रोल पंपावर डिझेलसाठी रांगा लागत आहेत. अनेक पेट्रोल पंपावर मारामाऱ्या होत आहेत. या संदर्भात छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी डिझेल आणि पेट्रोलच्या स्थिती बद्दल माहिती दिली आहे.मागच्या महिन्यात ज्या पद्धतीने इंधन पुरवठा होता, त्याच पद्धतीने तो सुरू आहे, उलट यावर्षी वाढ झाली असल्याचे प्रवीण फुलारी यांनी सांगितले आहे.

काही पंप दुपारनंतर ड्राय …

गेल्या महिन्या प्रमाणेच इंधन पुरवले जात आहे. उलट यावेळी वाढ झाली आहे. BPCL कंपनी सोडली तर IPCL आणि HPCL कंपनीकडून 23% ची वाढ झाली आहे. मागणी तेवढा पुरवठा होत नाही, मात्र पुरवठा सगळीकडे होत आहे.आपल्याकडे 1900KL पेट्रोल आहे तर 1200KL डिझेल आहे. काही भागात डिझेलचा साठा कमी आहे ,त्यामुळे जास्त गर्दी होत आहे. त्यामुळे काही पंप दुपारनंतर ड्राय होत आहेत असेही जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी म्हटले आहे.

स्टॉक असताना पंप बंद केला…

इंधन साठा किंवा काळाबाजार केल्याचा प्रकार आढळलेला नाही. मात्र काही टेक्निकल बाबी आहेत. काही लोकांनी स्टॉक असताना पंप बंद केला होता, त्यामध्ये आम्ही रिपोर्ट तयार करून त्या- त्या कंपनीला अशा पंपांवर कारवाई करण्यासाठी पाठवलं आहे. जिथे साठा आहे तिथे वाटप करावे असे आदेश समितीने कंपनीला दिले आहेत, तुळजा माता पेट्रोल पंपावर जो प्रकार घडला त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल असेही प्रवीण फुलारी यांनी म्हटले आहे.

पेट्रोल पंपावर तलाठी नेमणार का ?

असा निर्णय आम्ही अजून घेतलेला नाही, बुलढाणा जिल्ह्याने तसे आदेश काढले आहेत.बुलढाण्यात पेट्रोल पंपांवर तलाठी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे तलाठी पेट्रोल पंपावर वॉच ठेवणार आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर अनुचित प्रकार किंवा गोंधळ झाल्यास टीम पाठवून कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रवीण फुलारी यांनी म्हटले आहे.

आपल्याकडे जिल्ह्यामध्ये 363 पंप आहेत आणि सर्व पंपावर कर्मचारी देणे आपल्याला शक्य होणार नाही.जिथे आवश्यकता असेल, गर्दी असेल, गैरप्रकार होण्याची शक्यता असते तिथे टीम पाठवून कारवाई करू.  शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ट्रॅक्टरचे आरसी बुक किंवा फार्मर आयडी द्याव्यात, माननीय जिल्हाधिकारी सोबत चर्चा केल्यानंतर त्यावर योग्य ते आदेश काढले जातील असे फुलारी यांनी सांगितले.

वैजापूरमध्ये दोन हजार रुपयांच्या डिझेलवर 450 रुपयाचे ऑईल कंपल्सरी केल्याचा प्रकार झाला होता. त्यावर बोलताना फुलारी म्हणाले की आम्ही तिथे आमची टीम पाठवून कारवाई केली आहे, त्यामुळे तो प्रकार बंद झाला आहे. त्यांनी एक दिवस तसा प्रकार केला होतो असेही फुलारी यांनी सांगितले.

साठे बाजांवर आपण एसी एक्ट नुसार कारवाई करत असतो, शक्यतो गैरप्रकार किंवा काळाबाजार ज्या टेक्निकल बाबी आहेत, त्या कंपनीच्या अंतर्गत येतात,वैजापूरच्या पंपावर सुद्धा आम्ही कारवाई केली असल्याचे फुलारी यांनी सांगितले.

वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये 25000 रुपयांचे डिझेल दिल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत बोलताना फुलारी म्हणाले की आमच्याकडे तक्रार दाखल झाली आहे. आम्ही कंपनीला सुद्धा कारवाई करा असे सांगितले आहे. काही काही पंप चालक मनमानी करत आहेत, त्यांना आम्ही इशारा दिला आहे. आम्ही कंपनींना सुद्धा तेच सांगितले आहे की तुम्ही दोन-तीन पंप बंद करा असेही फुलारी यांनी सांगितले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष
  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in