• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पेट्रोल आणि गॅस सिलिंडरच्या दरवाढीनंतर अजून एक मोठा दणका, थेट विमानाचेही दर..

June 10, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्धात भारतात मोठा फटका बसत आहे. भारतात अनेक गोष्टींच्या किमती वाढताना दिसत आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. एलपीजी गॅसच्याही किमतीमध्ये वाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानंतर अनेक गोष्टींच्या भावात वाढ झाली. थेट फटका बसत आहे. विमान प्रवासही महागला आहे. सरकारच्या नवीन किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत देशात विमान कंपन्या आता एव्हिएशन टर्बाइन फ्युएलचे (ATF) दर तीन वर्षांपर्यंत निश्चित करू शकतात. सरकारी इंधन कंपन्यांनी जेट इंधनाच्या दरात तब्बल 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. आता नवीन योजनेनुसार, विमान कंपन्यांना एटीएफसाठी प्रति लिटर 115 रूपये इतकी किंमत मोजवी लागणार आहे. यापूर्वी याचे दर प्रति लिटर 104.927 होते. आता त्यात मोठी वाढ झाली.

या दरवाढीमुळे आता विमान प्रवासही अजून महागणार हे निश्चित आहे. ज्या विमान कंपन्या याबाहेर राहण्याचा निर्णय घेतील, त्या बाजारभावाशी निगडित दरांवरच इंधन खरेदी सुरू ठेऊ शकतात. हे दर सध्या प्रति लिटर सुमारे 142 रुपये इतके आहेत, जे आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना लागू असलेल्या दरांच्या बरोबरीचे आहेत. इराण आणि अमेरिका युद्धादरम्यान अनेक गोष्टींमध्ये भाव वाढ होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही योजना पूर्णपणे ऐच्छिक आहे. कोणत्याही विमान कंपन्यांना याकरिता दबाव नाहीये. ज्या विमान कंपन्यांना यात सहभागी व्हायचे त्याच यात सहभागी होऊ शकतात. याबाबत विमान कंपन्या स्वत: जो काही निर्णय आहे, तो घेतील. लॉक-इन कालावधीत आंतरराष्ट्रीय बेंचमार्क किमतींमधील चढ-उतारांपासून संरक्षण मिळेल. ज्या कंपन्या या योजनेत भाग घेणार नाहीत, त्यांना जर इंधनाच्या किमती कमी झाल्या तर फायदा होईल.

जर त्या सहभागी झाल्या नाहीत आणि इंधनाचे दर वाढले तर त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार हे देखील खरे आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात संघर्ष वाढला आणि जगात इंधनाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. त्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. दिल्लीतील देशांतर्गत एटीएफ (ATF) चे दर गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून प्रति लिटर सुमारे 105 रुपये या पातळीवर स्थिर राहिले आहे. यादरम्यानच हा मोठा निर्णय घेण्यात आला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जगात खळबळ! अमेरिकेने घेतला व्हिसाबद्दल अत्यंत धक्कादायक निर्णय, थेट नियोजित..
  • Khavdya Dongar: वडिलांनी घर सोडलं अन् कुणाल पार खचला, मानसिक धक्क्यामुळे…अखेर ‘ते’ सत्य आलंच समोर..
  • सर्वात मोठी बातमी ! मोदींची प्रकृती बरी नाही, अस्वस्थ, थकले… कुणी केला दावा?
  • मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले…या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
  • तिच्या निधनानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला, थेट आठ दिवस व्हाईट हाऊसमध्ये…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in