• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पुण्यातून धावणार बुलेट ट्रेन, या बड्या शहराला जोडणार; रेल्वेमंत्र्यांनी सांगितला खास प्लॅन

July 11, 2026 by admin Leave a Comment


जगातील काही देशांमध्ये बुलेट ट्रेन धावताना पहायला मिळत आहे. भारतातही मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. अशातच आता इतरही शहरांना बुलेट ट्रेन मिळणार आहे. देशाच्या हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी नेटवर्कमध्ये लवकरच मोठा बदल होणार असून, या बदलाचे केंद्र हैदराबाद असणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. हैदराबादला तीन हाय-स्पीड बुलेट ट्रेन कॉरिडॉर मिळणार आहेत. हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ हैदराबादचेच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण भारताच्या अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल घडवून आणणार आहेत. याचा फायदा पुण्यालाही होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादला तीन हाय-स्पीड बुलेट ट्रेन कॉरिडॉर दिले आहेत. पुणे-हैदराबाद, हैदराबाद-चेन्नई आणि हैदराबाद-बेंगळुरू हे कॉरिडॉर शहराचे रूप पालटतील. त्यामुळे हैदराबाद हाय-स्पीड रेल्वेचे प्रमुख केंद्र बनेल. यामुळे मोठ्या प्रमाणावर विकास होईल आणि या संपूर्ण प्रदेशातील अर्थव्यवस्था एकमेकांशी अधिक प्रभावीपणे जोडल्या जातील.’

देशातील तीन प्रमुख शहरांशी हैदराबाद थेट जोडले जाणार

पुणे-हैदराबाद, हैदराबाद-चेन्नई आणि हैदराबाद-बेंगळुरू या बुलेट ट्रेन कॉरिडॉरमुळे हैदराबादचा देशातील तीन महत्त्वाच्या औद्योगिक, आयटी आणि व्यावसायिक केंद्रांशी थेट संपर्क होणार आहे. या वेगवान रेल्वे नेटवर्कमुळे संपूर्ण दक्षिण भारतातील संपर्क आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे.

तेलंगणा रेल्वेला 5,400 कोटींचे मोठे बजेट

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने तेलंगणासाठी रेल्वे विकासाकरिता 5,400 कोटींचे भरीव बजेट मंजूर केले आहे. या निधीमुळे राज्याच्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल घडणार आहे.’

तीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे प्रमुख फायदे

पुणे, बेंगळुरू आणि चेन्नईसारख्या प्रमुख शहरांमध्ये कमी वेळात प्रवास करता येईल. याचा फायदा व्यावसायिकांसह सामान्य प्रवाशांनाही होईल. तसेच या तीन कॉरिडॉरमुळे पुण्याचा ऑटोमोबाईल उद्योग, बेंगळुरूचे आयटी हब, चेन्नईचे ऑटोमोबाईल व बंदर क्षेत्र आणि हैदराबादचा तंत्रज्ञान व फार्मा उद्योग एकमेकांशी अधिक प्रभावीपणे जोडले जातील. यामुळे व्यापार, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in