• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पावसाळ्यात फ्रिजमधून येतेय दुर्गंधी? मिठाने भरलेली वाटी करेल वास दूर, जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

July 2, 2026 by admin Leave a Comment


पावसाळ्याची प्रतिक्षा सर्वांना असते. पण पावसाळा आल्यानंतर अनेक समस्या देखील उद्भवतात. सर्वात मोठी समस्या म्हणजे फ्रिजमधून येणारा वास. सांगायचं झालं तर, पावसाळ्यात हवामान खूप थंड असतं. हवेत आर्द्रताही खूप असते आणि याच आर्द्रतेमुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील, विशेषतः फ्रिजमधील आर्द्रतेची पातळी वाढते , ज्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या, फळे आणि इतर पदार्थ लवकर खराब होतात. याशिवाय, जिवाणूंच्या वाढीची शक्यताही वाढते, ज्यामुळे फ्रिजमधून दुर्गंधी येऊ लागते. यामुळे संपूर्ण स्वयंपाकघराचं वातावरण बिघडतं. अशा परिस्थितीत, या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही फ्रिजमध्ये मिठाची वाटी ठेवू शकता. या किचन हॅकबद्दल थोडक्यात जाणून घ्या…

फ्रिजमध्ये मिठाची वाटी ठेवल्याने आर्द्रता शोषण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही फ्रिजमध्ये एका लहान वाटीत 100 ते 150 ग्रॅम मीठ ठेवता, तेव्हा ते हवेतील अतिरिक्त आर्द्रता हळूहळू शोषून घेतं. मिठामध्ये नैसर्गिकरित्या आर्द्रता शोषण्याचे गुणधर्म असतात, ज्यामुळे फ्रिजमधील आर्द्रता कमी होते आणि फ्रिज जिवाणूमुक्त राहतो. याचे इतरही काही फायदे आहेत.

मीठ ओलावा शोषून घेते: पावसाळ्यात जेव्हा फ्रिजटर वारंवार उघडला जातो, तेव्हा आतमध्ये ओलावा साचतो. अशात ओलावा वाढल्यास भाज्या लवकर खराब होतात आणि जिवाणूंची वाढही सुरू होते. पण मिठामध्ये ओलावा शोषून घेण्याची शक्ती असते. त्यामुळे, फ्रिडजमध्ये मीठ ठेवल्याने ओलावा शोषून घेण्यास मदत होते.

जेव्हा भाज्या, फळे, शिजवलेले अन्न आणि दुग्धजन्य पदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये जास्त काळ ठेवले जातात, तेव्हा त्यातून वायू बाहेर पडू लागतात. हा वायू संपूर्ण रेफ्रिजरेटरमध्ये पसरतो, ज्यामुळे दुर्गंधी येते. मीठामध्ये ओलावा आणि दुर्गंधी शोषून घेण्याची क्षमता असल्यामुळे, तुम्ही फ्रिजमध्ये मिठाची वाटी ठेवू शकता. या उपायामुळे फ्रिजची दुर्गंधी कमी होते आणि आर्द्रता नियंत्रणात राहिल्याने रेफ्रिजरेटरमधील अतिरिक्त दाब टाळला जातो.

फ्रिजमध्ये मीठ कसं ठेवाल?

तुमच्या फ्रिजमधील दुर्गंधी आणि ओलावा दूर करण्यासाठी, एका लहान वाटीत किंवा उघड्या भांड्यात 100 ते 150 ग्रॅम किंवा 3 ते 4 मोठे चमचे मीठ ठेवा आणि ते फ्रिजच्या एका कोपऱ्यात ठेवा. खडे मीठ असेल तर अधिक प्रभावी ठरेल.. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मीठ दर 15 ते २० दिवसांनी बदललं पाहिजे. मिठाऐवजी तुम्ही फ्रिजमध्ये बेकिंग सोडा ठेऊ शकता.

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कुणालचा हट्ट आयफोन नव्हताच, आजोबांचा हादरवणारा खुलासा, खवड्या डोंगरावर पोहोचण्याचं धक्कादायक कारण समोर..
  • विरोधकांना महिला आरक्षण 2034 पर्यंत रेटून न्यायचंय; देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक आरोप
  • सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत…केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
  • पती अन् सासूने टॉयलेट क्लीनर पाजल्याचा आरोप अन् व्हेंटिलेटरवर झुंज, विवाहीतेचा अखेर मृत्यू
  • रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा आंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in