• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘रामायणम्’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील 11 सेकंदाचा सीन लीक, सोशळ मीडियावर खळबळ, निर्माते म्हणाले…

July 2, 2026 by admin Leave a Comment


दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या महत्त्वाकांक्षी आणि बिग बजेट ‘रामायणम्’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत तर अभिनेता यश लंकेचा राजा रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर कथित ट्रेलरमधील 11 सेकंदांचा एक व्हिडिओ लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून चाहते संताप व्यक्त करत लीकप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या वेशात एका राक्षसाचा वध करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सच्या मते, हा सीन नुकत्याच पार पडलेल्या सिनेमाकॉन (CinemaCon) कार्यक्रमात दाखवण्यात आलेल्या ‘रामायणम्’च्या ट्रेलरचा भाग आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बाहेर कसा आला, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय?

दरम्यान, सोशल मीडियावरील अनेक युजर्सचा दावा आहे की हा लीक झालेला व्हिडिओ खरा नसून तो कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या मदतीने तयार करण्यात आला आहे. काहींनी या दाव्याच्या समर्थनार्थ संपूर्ण AI-निर्मित व्हिडिओही शेअर केला असून, हा व्हायरल क्लिप त्याचाच भाग असल्याचे म्हटले आहे.

विशेष म्हणजे, काही चाहत्यांनी हा कथित AI व्हिडिओ ‘रामायणम्’च्या अधिकृत टीझरपेक्षा आणि यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटापेक्षाही अधिक प्रभावी असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडिओबाबत विविध मतप्रवाह पाहायला मिळत आहेत.

WTF 🤯🤯🤯

🚨🚨
RAMAYANA Leaked Scene 🔥🔥🔥 pic.twitter.com/1i5UwEGD8n

— Mabbi_Gaadi_ Ruleee❤️‍🔥❤️‍🔥 (@ShruthiNai30968) July 1, 2026

नमित मल्होत्रा काय म्हणाले?

या प्रतिक्रियेनंतर चित्रपटाचे निर्माता नमित मल्होत्रा यांनी अधिकृत निवेदन जारी करत चाहत्यांना आश्वस्त केले होते. त्यांनी म्हटले होते की, आम्ही प्रेक्षकांच्या प्रत्येक प्रतिक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवत आहोत. अत्यंत समर्पणाने काम करत असून, ‘रामायण’ या महाकाव्याला योग्य तो सन्मान मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशा पद्धतीने ही महागाथा मोठ्या पडद्यावर साकारण्याची जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत. तुम्ही आतापर्यंत जे पाहिले आहे, ती केवळ सुरुवात आहे.

‘रामायणम्’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. पहिला भाग 8 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार असून, दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
  • विना कपड्याची समुद्रकिनारी धावलेली ही अभिनेत्री, नवऱ्याने केलेलं 4 वेळा लग्न, कैलास यात्रेतून परतलीच नाही
  • मोठी बातमी! ठाकरे गटानंतर आता आणखी एक मोठा पक्ष फुटला, ज्याची भिती होती शेवटी तेच घडलं, राजकारणात मोठा भूकंप
  • पूजा करताय पण जमिनीवर, आसनाशिवाय पूजा केल्यास काय होतं? दर्भासनचं महत्त्व घ्या जाणून
  • 20 वेळा नाकारलेलं गाणं, दिग्दर्शकही होते नाराज, उदित नारायण यांनी पत्नीचं ऐकलं अन्…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in