• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पाय मोडला अन् डॉक्टरने केली हृदयाची सर्जरी, अजब इलाज केल्याने महिलेसोबत भयंकर प्रकार; नेमकं काय घडलं?

July 27, 2026 by admin Leave a Comment


आपल्याला काहीही झाले, खरचटले किंवा मोठा अपघात झाला तर आपण पळात हॉस्पिटलमध्ये जातो. आपला हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर प्रचंड विश्वास असतो. पण जर तुमच्या दुखापत झालेल्या जागे ऐवजी डॉक्टरांनी चुकीच्या जागी उपचार केले तर? ऐकूनही भीती वाटते ना. पण असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेच्या पायात फ्रॅक्चर होता पण डॉक्टरांनी चुकून त्या महिलेची हार्ट सर्जरी केली आणि हृदयात स्टेंट टाकला. या महिलेचा मृत्यू झाला.

ही घटना हरियाणातील पानीपत जिल्ह्यात एका खाजगी रुग्णालयात घडली आहे. या रुग्णालयातील निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात पायाच्या फ्रॅक्चरच्या उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रुग्णाच्या हृदयात डॉक्टरांनी स्टेंट टाकले. ऑपरेशननंतर महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घातला. कुटुंबीयांचा आरोप आहे की महिलेला पायातील तुटलेल्या हाडाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्यांना न सांगता हृदयात स्टेंट टाकले. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रुग्णालय आणि डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

महिला कधी रुग्णालयात दाखल झाली होती?

मृत महिलेची ओळख ४२ वर्षीय गुड्डी देवी अशी झाली आहे. त्या पानीपतमधील रमेश नगर येथील रहिवासी होत्या. मृत महिलेचा मुलगा कुलदीप यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सांगितले की, २१ जुलै रोजी गाझियाबादमध्ये झालेल्या एका अपघातात त्यांच्या आईच्या पायाचे हाड तुटले होते. त्यानंतर २४ जुलै रोजी त्यांना उपचारासाठी पानीपतमधील पार्क रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हृदयात स्टेंट टाकल्याचा आरोप

कुटुंबीयांचा आरोप आहे की, २५ जुलै रोजी डॉक्टरांनी त्यांना न सांगता आणि लेखी संमती न घेता महिलेच्या हृदयात स्टेंट टाकले. आरोप असाही आहे की परवानगी पत्रावर बनावट सही केली गेली. स्टेंट टाकल्यानंतर महिलेची तब्येत बिघडली आणि उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. कुटुंबीयांचा आरोप आहे की, घटनेनंतर रुग्णालय प्रशासन त्यांच्यावर कारवाई न करण्याचा दबावही आणत होते.

पोलिस चौकशी करत आहेत

तक्रारीच्या आधारे सेक्टर-२९ ठाणे पोलिसांनी पार्क रुग्णालय आणि अज्ञात डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. वैद्यकीय नोंदींसह सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.दरम्यान, या प्रकरणात रुग्णालयाच्या सीईओ सपना यांनी कुटुंबीयांच्या आरोपांना फेटाळून लावत म्हटले की, पायाच्या ऑपरेशनपूर्वी प्री-अनेस्थेसिया तपासणी दरम्यान महिलेच्या हृदयात गंभीर समस्या दिसून आली होती. त्यानंतर अँजिओग्राफी करण्यात आली, ज्यात एक धमनी ब्लॉक आढळली. त्यांचा दावा आहे की, याबाबत कुटुंबाला पूर्ण माहिती देण्यात आली होती आणि त्यांच्या संमतीनंतरच स्टेंट टाकण्यात आले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in