• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पायलटची डोप टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास किती सजा मिळते ? DGCA चे नियम नेमके काय ?

August 13, 2026 by admin Leave a Comment


एअर इंडियाच्या ४ ऑगस्ट रोजी फुकेत ते दिल्ली फ्लाईटच्या पायलटच्या ड्रग टेस्टमध्ये मारिजुआना ( गांजा )पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.फुकेत ते दिल्ली फ्लाईट दरम्याने वेगवान टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला होता. या घटनेनंतर पायलटची ड्रग टेस्ट आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर केल्या जाणाऱ्या कारवाईनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामुळे आता जर पायलटची डोप टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कोणती शिक्षा होते ? या संदर्भात DGCA चे नियम काय आहेत हे पाहूयात…

प्रत्येक फ्लाईटच्या आधी ड्रग टेस्ट होते ?

ड्रग टेस्ट आणि मद्याच्या ब्रेथ एनालायझर वेगवेगळी प्रक्रिया केली जाते. एअरलाईन्स आणि एअर नेव्हीगेशन सेवा देणाऱ्यांना दर वर्षी किमान १० टक्के फ्लाईट क्रु आणि एअर ट्रॅफीक कंट्रोलर्सची रँडम ड्रग टेस्ट करणे अनिर्वाय आहे. मात्र, ही टेस्ट प्रत्येक उड्डाणाआधी केली जात नाही.

चाचणी कोणते ड्रग तपासले जाते ?

या डोपिंग चाचणीत एम्फेटामाईन, कॅनबिस (मारिजुआना), कोकीन, ओपिएट्स, बार्बिट्युरेट्स आणि बेंजो डायजेपीन सारख्या सायकोएक्टीव्ह पदार्थांची तपासणी केली जाते.

‘नॉन-निगेटिव्ह’ चा अर्थ काय ?

सुरुवातीच्या स्क्रीनिंगमध्ये ड्रगचे अंश सापडल्यानंतर रिपोर्ट ‘नॉन-नेगेटिव्ह’ मानली जाते. यानंतर सँपलचे कन्फर्मेटरी टेस्ट केली जाते. ज्यात पॉझिटिव्हची पुष्टी मिळते.

पहिल्यांदा कन्फर्मेटरी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर काय होते ?

पहिल्यांदा कन्फर्मेटरी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पायलटला डॉक्टर, काऊन्सिलर वा डी-एडीक्शन आणि रिहॅबिलिटेशन सेंटरला पाठवले जाते. दुसऱ्यांदा ड्रग टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आणि मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्या वैमानिकाला ड्युटीवर पुन्हा परतण्याची संधी दिली जाते. पॉझिटिव्ह प्रकरण २४ तासांच्या आत डीजीसीएला सांगणे बंधनकारक आहे.

दूसऱ्यांदा-तिसऱ्यांदा पॉझिटिव्ह आल्यानंतर सजा

पुनर्वसन केंद्रातून परत आलेला वैमानिक कन्फर्मेटरी टेस्टमध्ये दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आढळला तर वैमानिकांचा परवाना तीन वर्षांसाठी निलंबित केला जातो. तिसऱ्यांदा पॉझिटिव्ह आल्यानंतर वैमानिकांचे लायसन्स कायमचे रद्द केले जाते.

पायलटने टेस्ट करण्यास नकार दिला तर ?

जर पायलटने चाचणी करण्यास नकार दिला तर असेल तर ४८ तासात टेस्ट क्लिअर न केल्यास लायसन्स एक वर्षांसाठी निलंबित होते. दुसऱ्यांदा नकार दिल्यास तीन वर्षांचे निलंबन आणि पुढे उल्लंघन केल्यानंतर लायसन्स रद्द करण्याची तरतूद आहे. हे कठोर नियम विमान सेवा सुरक्षित करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in